Madam Sapna Teaser । हरियाणाची स्टार डान्सर सपना चौधरीच्या बायोपिक चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ‘मॅडम सपना’ असे या चित्रपटाचे नाव आहे. बायोपिकची घोषणा करण्यासाठी सपनाने तिच्या इन्स्टा अकाउंटवरून सर्व फोटो हटवले होते. स्टार डान्सरच्या आयुष्यातील चढ-उतार या चित्रपटात दाखवण्यात येणार आहेत. आता ‘मॅडम सपना’चा टीझर रिलीज झाला आहे. अभिनेत्री, डान्सर सपना चौधरीचा हरियाणाच्या कठोर आणि आव्हानात्मक भूमीपासून कान्सच्या ग्लॅमरस रेड कार्पेटपर्यंतचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. टीझरमध्ये सपनाने तिची ओळख दिली आहे. तिचा हा प्रवास जवळपास 16 वर्षांचा असल्याचे सांगितले. जेव्हा मला समजआली तेव्हापासून मी माझे वडील आजारी पाहिले आहेत. आई नोकरी करायची. कर्ज खूप होतं, घर गहाण होतं, त्यामुळे जगण्यासाठी काहीतरी करावं लागलं. सपनाने स्टेज निवडला. यावेळी तिला लोकांचा अपमानाचा सहन करावा लागला. लोकांच्या घाणेरड्या बोलण्याला कंटाळून तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आयुष्यात इतका संघर्ष पाहिल्यानंतर आज सपना उंच उभी आहे. हाच प्रवास मॅडम सपना या चित्रपटात दाखविण्यात आला आहे. शायनिंग सन स्टुडिओच्या बॅनरखाली ‘मॅडम सपना’ची निर्मिती होणार आहे. महेश भट्ट प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती विनय भारद्वाज आणि रवीना ठाकूर करणार आहेत. हा चित्रपट सपनाच्या जीवन संघर्षाची, तिची स्वप्ने आणि तिच्या दृढ धैर्याची रंजक कथा असेल लवकरच या चित्रपटाची रिलीज डेट शेअर करण्यात येणार आहे. =================