Cut Match Ball : क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं! सामन्याचा चेंडू कापून केले दोन तुकडे; नेमकं कारण काय? घ्या जाणून
Cut Match Ball : हेडिंग्ले येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात क्रिकेट जगताने एक अत्यंत दुर्मीळ आणि थक्क करणारे दृश्य पाहिले.

Ollie Robinson Josh Tongue 5 Wicket Hauls Cut Match Ball In Half : क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा आगळेवेगळे प्रसंग घडतात, मात्र इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात हेडिंग्ले येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात क्रिकेट जगताने एक अत्यंत दुर्मीळ आणि थक्क करणारे दृश्य पाहिले. पहिल्याच दिवशी इंग्लंडचे वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सन (Ollie Robinson) आणि जोश टंग (Josh Tongue) यांनी पाकिस्तानचा पहिला डाव अवघ्या १७१ धावांवर गुंडाळला. विशेष म्हणजे, या दोघांनीच प्रत्येकी ५-५ विकेट्स घेत संपूर्ण १० विकेट्स आपापसात वाटून घेतल्या. या ऐतिहासिक कामगिरीनंतर ‘मॅच बॉल’ नक्की कुणाकडे राहणार यावरून वाद न घालता दोघांनी चेंडूचे दोन तुकडे करून अर्धा-अर्धा चेंडू आपल्याकडे ठेवला.
मैदानात उपस्थित ग्राउंड स्टाफच्या मदतीने कापला चेंडू –
सामान्यतः डावात ५ विकेट्स घेणारा गोलंदाज तो चेंडू आठवण म्हणून स्वतःकडे ठेवतो. मात्र, एकाच डावात दोघांनीही ५-५ बळी घेतल्याने चेंडूवर कुणाचा हक्क, असा पेच निर्माण झाला होता. यावर तोडगा काढत रॉबिन्सन आणि टंग यांनी हेडिंग्लेच्या मैदानातील कर्मचाऱ्यांच्या (Ground Staff) मदतीने चेंडू मधोमध कापून त्याचे दोन समान भाग केले. रॉबिन्सन म्हणाला, “एकाच डावात दोन गोलंदाजांनी प्रत्येकी ५ विकेट्स घेणे रोज घडत नाही. त्यामुळे हा कापलेला अर्धा चेंडू आमच्यासाठी या ऐतिहासिक दिवसाची आयुष्यभराची सुंदर आठवण ठरेल.”
पहिल्याच चेंडूवर विकेट अन् १७१ धावांत पाकिस्तान गारद –
Josh Tongue and Ollie Robinson have had the ball split in half so they can both have a momento from their five-wicket hauls 🏴🏏
Brilliant picture by @dudleyplatypus 📸#ENGvPAK pic.twitter.com/a5yUZIvuMx
— England’s Barmy Army 🏴🎺 (@TheBarmyArmy) August 19, 2026
सामन्याची सुरुवातच वादळी झाली; ऑली रॉबिन्सनने सामन्याच्या अगदी पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानच्या सलामीवीराला बाद करत मोठा धक्का दिला. त्यानंतर जोश टंगने आपल्या भेदक माऱ्याने मधली आणि तळाची फळी उद्ध्वस्त केली. या दोघांच्या तुफानी माऱ्यासमोर पाकिस्तानचा संपूर्ण संघ १७१ धावांवर गारद झाला. दोघांनी संपूर्ण १० फलंदाजांना तंबूत धाडत सामन्यावर इंग्लंडची मजबूत पकड निर्माण केली.
२००६ नंतर १८ वर्षांनी घडला असा ऐतिहासिक विक्रम –
So, what did they do with the match ball? 🤔
A simple solution to a unique problem!
Click below for the full interview:
— England Cricket (@englandcricket) August 19, 2026
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एकाच डावात दोन गोलंदाजांनी ५-५ विकेट्स घेण्याची ही इंग्लंडसाठी १६ वी वेळ ठरली. यापूर्वी तब्बल १८ वर्षांपूर्वी म्हणजे २००६ मध्ये ओल्ड ट्रॅफर्ड येथे स्टीव्ह हार्मिसन आणि मॉन्टी पानेसर या जोडीने पाकिस्तानविरुद्धच अशी कामगिरी केली होती. आता रॉबिन्सन आणि टंग यांच्या या अनोख्या चेंडू वाटणीच्या सेलिब्रेशनचा किस्सा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.





