Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना लागू होणार! काँग्रेस सरकारचा ‘या’ राज्यात मोठा निर्णय

Updated On:

कॉंग्रेस सरकारने पाळले निवडणूक आश्‍वासन

राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत निर्णय

शिमला – हिमाचल प्रदेशात पुन्हा जुनी पेन्शन योजना लागू होणार आहे. त्याविषयीच्या निर्णयावर शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. त्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीवेळी दिलेले आश्‍वासन कॉंग्रेसने त्या राज्याची सत्ता मिळाल्यानंतर पाळले.

हिमाचलमध्ये सध्या नव्या पेन्शन योजनेंतर्गत सुमारे 1 लाख 36 हजार कर्मचारी येतात. त्यामध्ये 12 हजार पेन्शनर्सचा समावेश आहे. संबंधित कर्मचारी आणि पेन्शनर्स आता जुन्या योजनेचे लाभार्थी ठरतील.

जुनी पेन्शन योजना लागू केल्याने चालू वर्षी सरकारी तिजोरीवर 800 ते 900 कोटी रूपयांचा भार पडेल. तो खर्च डीझेलवर याआधीच करण्यात आलेली करवाढ आणि महसुलाच्या इतर स्त्रोतांमधून भरून काढला जाणार असल्याचे समजते. नव्या पेन्शन योजनेंतर्गत सरकार आणि कर्मचारी वेतनाच्या अनुक्रमे 10 आणि 14 टक्के हिस्सा पेन्शन फंडात जमा करतात.

1 जानेवारी 2004 पासून सरकारी सेवेत रूजू झालेले कर्मचारी नव्या योजनेत समाविष्ट होतात. तर, जुन्या पेन्शन योजनेंतर्गत 20 वर्षांचा सेवाकाळ पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्वांत अखेर मिळालेल्या वेतनाच्या 50 टक्के इतकी रक्कम पेन्शन म्हणून मिळायची.

आणखी संबंधित बातम्या

Himachal Pradesh Rain: हिमाचलमध्ये निसर्गाचे रौद्ररूप! 150 बळी अन् शेकडो कोटींचे नुकसान

2026-08-08 22:15:42

Himachal Pradesh Rain: हिमाचलमध्ये निसर्गाचे रौद्ररूप! 150 बळी अन् शेकडो कोटींचे नुकसान

Sukhvinder Singh Sukhu: हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय ! सर्व कॅबिनेट पदे रद्द ; २०% पगार आणि भत्तेही स्थगित

2026-03-17 13:35:57

Sukhvinder Singh Sukhu: हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय ! सर्व कॅबिनेट पदे रद्द ; २०% पगार आणि भत्तेही स्थगित

Accident News : काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली; 3 जणांचा मृत्यू

2026-02-03 18:17:55

Accident News : काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली; 3 जणांचा मृत्यू

काश्मीर-हिमाचलमध्ये हिमवृष्टी: उत्तर भारतात थंडीचा कडाका; उत्तर प्रदेशात धुक्यामुळे भीषण अपघातात 5 ठार

2026-01-17 16:40:17

काश्मीर-हिमाचलमध्ये हिमवृष्टी: उत्तर भारतात थंडीचा कडाका; उत्तर प्रदेशात धुक्यामुळे भीषण अपघातात 5 ठार

जुनी पेन्शन योजना लागू होणार की नाही? केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनी लोकसभेत दिले स्पष्टीकरण

2025-12-16 18:54:56

जुनी पेन्शन योजना लागू होणार की नाही? केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनी लोकसभेत दिले स्पष्टीकरण