ओला इलेक्ट्रिकला सरकारकडून 73 कोटी 74 लाख रुपयाचे अनुदान प्राप्त
Updated On:

मुंबई – इलेक्ट्रिक दुचाकी वाहन क्षेत्रातील ओला इलेक्ट्रिक कंपनीला उत्पादन आधारित अनुदान योजनेअंतर्गत अनुदान मिळाले आहे. या योजनेअंतर्गत या क्षेत्रात अनुदान मिळविणारी ही पहिलीच कंपनी ठरली आहे. या कंपनीने यासंदर्भात शेअर बाजाराला कळविलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2023- 24 यासाठी या कंपनीला सरकारकडून 73 कोटी 74 लाख रुपयाचे अनुदान प्राप्त झाले आहे.
भारतात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढावी आणि उत्सर्जन कमी व्हावे यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. आम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकलो ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आम्ही भारतात वाहन क्षेत्रात क्रांती व्हावी या दृष्टिकोनातून काम सुरू केले आहे. आगामी काळातही हे काम याच निष्ठेने करू असे कंपनीने म्हटले आहे.





