अरे देवा ! तरुणाने नवस पूर्ण झाला नाही म्हणून मंदिराचीच केली तोडफोड
Updated On:

नवी दिल्ली : मध्य प्रदेशच्या इंदौरमध्ये देवाला केलेला नवस पूर्ण झाला नाही म्हणून एकाने चक्क मंदिराची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे.
हिंदू संघटनेने या घटनेची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी शुभम कैथवास नावाच्या व्यक्तीला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम कैथवास नावाचा व्यक्ती नवस पूर्ण झाला नाही म्हणून नाराज होता. यासाठी त्याने इंदौरच्या चंदन नगर आणि छत्रीपुरा ठाणे हद्दीतील मंदिरांमध्ये तोडफोड केली.
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज जेव्हा समोर आले तेव्हा काही संघटनांनी विरोध करत तक्रार केली आणि आरोपीला अटक केली आहे.




