अरे बापरे! महिलेने एकाच वेळी दिला चक्क 9 मुलांना जन्म; आई अन् सर्व बाळं सुखरुप

न्यूयॉर्क : साधारणपणे आत्तापर्यंत असे मानले जात आहे की, जर 3 पेक्षा जास्त मुले एकत्र जन्माला आली तर त्यांची जगण्याची शक्यता कमी असते. मात्र या सर्व समजाला एका महिलेने तडा दिला आहे. कारण एका महिलेने चक्क 9 मुले जन्माला घातली असून आई आणि बाळ सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे.
माली येथील एका महिलेने एकाच वेळी 9 मुलांना जन्म दिला. एकत्र जन्मलेले हे पहिले नऊ जिवंत मुले राहिले आहेत. मालीमध्ये हलिमा सिसे नावाच्या महिलेने वयाच्या 25 व्या वर्षी 9 मुलांना जन्म दिला. हलीमाच्या पोटात 7 पेक्षा जास्त मुले आहेत, समजल्यानंतर प्रसूतीमध्ये अडचणी येऊ शकतात, तेव्हा तिला मे 2021 मध्ये मोरोक्कोला पाठवण्यात आले. मुलांना कॅसाब्लांका येथे वैद्यकीय मदतीसाठी ठेवण्यात आले होते. 19 महिने सतत उपचार घेतल्यानंतर हलीमा आता घरी परतली आहेत. या मुलांवर मोरोक्को येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले.
मालीची राजधानी बामाको येथे परतल्यानंतर मुलांचे वडील अब्देल कादर अरबी यांनी सरकारचे आभार मानले आणि सरकार कुटुंबाला आर्थिक मदत करत असल्याचे सांगितले. अल्लाहने आपल्याला आशीर्वाद दिल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांची काळजी घेण्यास मदत होईल. मालीचे आरोग्य मंत्री डायमिनाटौ संगारा यांनी, सरकार कुटुंबाला पाठिंबा देत राहील” असे म्हटले आहे.
एका संकेतस्थळाच्या वृत्तानुसार, 9 मुलांपैकी 5 मुली आणि 4 मुले आहेत. कादिदिया, फातिमा, हवा, अदामा आणि ओउमो अशी या मुलींची नावे आहेत. मोहम्मद, उमर, एल्हादजी आणि बाह अशी या मुलांची नावे आहेत. जन्माच्या वेळी या मुलांचे वजन 500 ग्रॅम ते 1 किलोग्रॅम दरम्यान होते.





