रिल बनवणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना बसणार फटका; देवेंद्र फडणविसांनी स्पष्ट केली भूमिका

CM Devendra Fadnavis | अनेकदा शासकीय अधिकारी आणि कर्मचारी सोशल मीडियावर रिल बनवून शेअर करतात. याबाबत भाजप आमदार परिणय फुके यांनी सोशल मीडियावर रिल बनवून टाकणाऱ्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. तसेच त्यांच्या वर्तनावर निर्बंध आणण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर जीआर केला जाईल, बेशिस्त नियम खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा दिला.
मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाने सेवा शर्ती नियम १९७९ साली तयार केले होते. त्यावेळी सोशल मीडिया नव्हता. त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग आणि वर्तवणुकीसंदर्भात नवे नियम तयार करण्यात येतील. आता सोशल मीडियात अनेक ठिकाणी सरकारचे कर्मचारी सरकारविरोधी ग्रुपचे सदस्य झाले आहेत. ते सरकारविरोधी पोस्ट करत आहे. यासंदर्भात काही नियम करणे गरजेचे आहे. CM Devendra Fadnavis |
‘सरकारची अपेक्षा आहे की, सोशल मीडियावर आमच्या अधिकाऱ्यांनी सक्रीय हवे. त्याचा वापर त्यांनी नागरिकांसाठी केला पाहिजे. माध्यमांचा उपयोग आणि वर्तवणूकीसंदर्भात नवे नियम तयार करण्यात येतील. यासंदर्भात सविस्तर जीआर काढला जाणार आहे. बेशिस्त नियम खपवून घेतले जाणार नाही. पुढील तीन महिन्यात यासंदर्भात आम्ही धोरण निश्चित करू,’ असंही फडणवीसांनी म्हटलं आहे. CM Devendra Fadnavis |
हेही वाचा:
Pune : अग्निशमन दलाकडून नदीमध्ये अडकलेल्या 19 वर्षीय तरुणाला जीवदान





