जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, राज्यभरात संताप; अखेर वसंत देशमुखांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Vasant Deshmukh | भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या सभेत वसंत देशमुख यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर पसरले होते. या प्रकरणी देशमुख यांच्या विरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर फरार असलेल्या वसंत देशमुखांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. Vasant Deshmukh |
वसंत देशमुख यांना अहमदनगर जिल्ह्याच्या बाहेरून ताब्यात घेण्यात आलं आहे. वसंतराव देशमुख यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी सकाळी पुणे येथील एका फ्लॅटमधून ताब्यात घेतले. आक्षेपार्ह वक्तव्य केल्यापासून ते फरार होते, अखेर नगर जिल्ह्याच्या बाहेर असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. Vasant Deshmukh |
नेमकं काय घडलं?
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांच्या संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत वसंत देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं. त्यानंतर संगमनेरमध्ये मोठा गदारोळ झाल्याचे दिसून आले. Vasant Deshmukh |
काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक
काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत गाड्यांची जाळपोळ केली. तर संगमनेर पोलीस स्टेशनबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी तब्बल 12 तास ठिय्या मांडला. मात्र पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर संगमनेरचे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले होते.
दरम्यान, जयश्री थोरात यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात मोठी खळबळ माजली होती. अखेर वसंत देशमुख यांना स्थानिक गुन्हे शाखेने नगर जिल्ह्याबाहेरुन ताब्यात घेतले आहे. त्यांना लवकरच संगमनेर येथे आणलं जाईल. त्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाऊ शकते.
हेही वाचा:
केंद्र सरकारची कारवाई; 162 हेल्मेट उत्पादक कंपन्यांचे परवाने रद्द





