Odisha : ६ हजारांच्या पगारावरून थेट कोट्यवधींचे घबाड; इंजिनिअरकडे तब्बल २ कोटी कॅश, ५ इमारती, १३ प्लॉट्स अन्…
Odisha: ओडिशामधील कंधमाल जिल्ह्यातील बालीगुडा येथे कारवाई करण्यात आली.

Odisha : अवघ्या ६ हजार रुपये महिना पगारावर नोकरीची सुरुवात करणाऱ्या एका सहाय्यक कार्यकारी अभियंत्याकडे कोट्यवधींची मालमत्ता सापडली आहे. ओडिशामध्ये एका सरकारी अधिकाऱ्याची कमाई आणि मालमत्ता यातील तफावत पाहून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारीही थक्क झाले आहेत.
छाप्यादरम्यान या अधिकाऱ्याच्या बँक लॉकरमधून सुमारे २ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ओडिशामध्ये एका सरकारी अधिकाऱ्याची कमाई आणि मालमत्ता यातील तफावत पाहून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारीही थक्क झाले आहेत.
दक्षता विभागाने शनिवारी ‘इंटीग्रेटेड ट्रायबल डेव्हलपमेंट एजन्सी’च्या (ITDA) असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरच्या (AEE) ९ ठिकाणांवर छापेमारी केली. पथकाने भुवनेश्वर, जाजपूर, बारीपाडा आणि बलिगुडा येथील त्यांच्या एकूण ९ ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले. संबंधित इंजिनिअरचे नाव बैकुंठ नाथ बेहरा असे आहे. बेहरा यांच्याविरुद्ध उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याचे आरोप होते. ओडिशामधील कंधमाल जिल्ह्यातील बालीगुडा येथे ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत बेहरा यांच्याकडे एका पाच मजली इमारतीसह १३ महागड्या प्लॉट्सचा समावेश आहे. याशिवाय, त्यांच्या दोन लॉकरमधून २ कोटी रुपयांची रोकड आणि ३०० ग्रॅमपेक्षाही अधिक सोने जप्त करण्यात आले आहे. ही रोकड मोजण्यासाठी बँकेतून कॅश काउंटिंग मशीन मागवावे लागले. हे दोन्ही लॉकर्स इंजिनिअर बेहरा यांच्या पत्नीच्या नावावर रजिस्टर्ड होते.
इंजिनिअरकडे सापडलं कोट्यावधींचे घबाड
आतापर्यंतच्या तपासात, पाच इमारती आढळून आल्या आहेत. यात भुवनेश्वरमधील चार आलिशान इमारतींचा समावेश आहे. यामध्ये नीलाद्री विहारमधील १०,५०० चौरस फुटांची चार मजली इमारत, शैलश्री विहारमधील १,१०० चौरस फुटांची तीन मजली इमारत, कानन विहारमधील ३,७५० चौरस फुटांची दोन मजली इमारत आणि चंद्रशेखरपूरमधील २,५०० चौरस फुटांची दोन मजली इमारत.
तसेच जाजपूरच्या धर्मशाळा येथील वडिलोपार्जित जमिनीवरील २,५०० चौरस फुटांच्या दोन मजली इमारतीचा समावेश आहे. तसेच भुवनेश्वरच्या प्रमुख भागांत ७, जाजपूरमध्ये ५ आणि बारीपदा येथे १ असे एकूण १३ महागडे प्लॉट आढळले आहेत. अधिकाऱ्यांचे पथक सोन्याचे दागिने, बँकेतील ठेवी, पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक आणि इतर आर्थिक गुंतवणुकीचीही कसून चौकशी करत आहे.
६ हजारांच्या नोकरीपासून कोट्यवधींचा प्रवास
धक्कादायक बाब म्हणजे, वैकुंठनाथ बेहरा यांनी १९९९ मध्ये ज्युनिअर इंजिनिअर (कनिष्ठ अभियंता) म्हणून नोकरीची सुरुवात केली होती, तेव्हा त्यांचा पगार अवघा ६ हजार रुपये होता. त्यानंतर पदोन्नती मिळून ते ‘AEE’ बनले, परंतु त्यांच्याकडील संपत्ती पाहून सारेच थक्क झालेत.
हेही वाचा:





