नागपुरात आज ओबीसींचा महामोर्चा; मराठा आरक्षणाचा जीआर रद्द करण्याची मागणी

OBC Reservation Nagpur Protest | ओबीसी समाजाकडून आज नागपुरात ‘ओबीसी आरक्षण बचाव’ महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेला २ सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची मागणीने सध्या जोर धरला आहे.
या मागणीसाठी सकल ओबीसी संघटनांच्यावतीने आज, शुक्रवारी यशवंत स्टेडियम ते संविधान चौकदरम्यान ओबीसी महामोर्चा निघणार आहे. मोर्चाची सुरुवात यशवंत स्टेडियम येथून दुपारी १२ वाजता होणार असून संविधान चौक येथे समारोपाची सभा होणार आहे. विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक नेते या मोर्चात सहभागी होणार आहे.
विजय वडेट्टीवार यांनी म्हणाले की, “सरकारने ओबीसींचा हक्क अबाधित ठेवत, मराठा समाजासाठी वेगळा मार्ग शोधावा. परंतु, विद्यमान जीआरमुळे ओबीसी समाजावर अन्याय होतो, म्हणून तो त्वरित मागे घ्यावा. मोर्चा यशवंत स्टेडियम येथून सुरू होऊन संविधान चौकात संपणार आहे. हा मोर्चा कोणत्याही पक्षाचा नाही. ओबीसी समाजाच्या हक्कासाठी आहे. ओबीसींच्या हक्काचे आरक्षण जर कोणी हिसकावून घेत असेल तर त्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी समाज एकवटला आहे. हा लढा कोणत्याही दुसऱ्या समाज विरोधात नाही तर ओबीसी हक्कासाठी आहे.”
मोर्चा शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्याचे आवाहन
दरम्यान, या आंदोलनाला राज्यातील विविध ओबीसी संघटना, सामाजिक कार्यकर्ते, आणि शैक्षणिक क्षेत्रातील नेते पाठिंबा देत आहेत. मोर्चा पूर्णपणे शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. सरकारने काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या हक्काच्या आरक्षणावर गदा येणार आहे. त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीच्या न्याय्य हक्कासाठी सर्व ओबीसी बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मुंबईत झालेल्या आंदोलनानंतर २ सप्टेंबरला राज्य सरकारने शासन निर्णय जारी केला. या शासन निर्णयात पात्र हा शब्द वगळण्यात आला त्यामुळे मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण मिळू शकते यातून ओबीसी समाजात असुरक्षेची भावना निर्माण झाली आहे.
हेही वाचा:





