Maharashtra Politics : भाजपमध्ये OBC नेत्यांना डावलले जाते – छगन भुजबळ

नागपूर – पंकजा मुंडे यांच्या मनात स्थानिक नेत्याबाबत दुःख आहे. त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्या मोदी आणि शहा यांना भेटणार आहे, हा योग्य मार्ग आहे. त्या राष्ट्रवादीत येणार का याची मला कल्पना नाही त्या येतील अस वाटत नाही. मात्र भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना डावलले जात असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केली.
ओबीसी मेळावाच्या निमित्ताने छगन भुजबळ नागपुरात आले असता ते बोलत होते. भाजपवर मोठ्या प्रमाणात ओबीसी नाराज आहे यावर भाजपने विचार करायला पाहिजे. ओबीसी डावलले जात असल्याचे लक्षात येताच भाजपने बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्ष केले, असेही ते म्हणाले.
भाजपने मुंबई पलिका लक्ष्य ठेवले आहे. प्रत्येक पक्ष आपली तयारी करणारच आम्ही देखील आपली तयारी करत आहे, असेही भुजबळ म्हणाले.
संजय राऊत यांच्या बद्दल मी बोलणे योग्य नाही. त्यांनी स्टॅलिन सोबत का तुलना केली हे माहिती नाही. याबाबत त्यांनाच विचारा. प्रत्येक नेत्यांनी टीका करताना मर्यादा सांभाळून बोलले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.





