अक्षय कुमारसह ‘हे’ बॉलिवूड सेलिब्रिटी भारतात करु शकत नाही मतदान!
Updated On:

२०१९ लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. दरवर्षी निवडणुकीत केवळ सामान्य लोकंच नाही तर बॉलिवूड सेलिब्रिटीही उत्साहात बघायला मिळतात. बॉलिवूड सेलिब्रिटीही भारतीय नागरिकांना मतदान करण्याचे आवाहनही करतात. मात्र यातील काही कलाकार असेही आहेत जे लोकसभा निवडणुकीत मतदान करु शकणार नाहीत. यात बॉलिवूडच्या टॉपच्या कलाकारांचा समावेश आहे.
- बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार याने अनेक चित्रपटातून देशप्रेम दाखविले आहे. तसेच अक्षय कुमारचा जन्म पंजाबच्या अमृतसरमध्ये झाला होता. मात्र अधिकृतपणे तो भारताचा नागरिक नाहीये. अक्षय कुमारकडे कॅनडाचा पासपोर्ट आहे. भारतीय नियमानुसार, तुम्ही दोन देशांचं नागरीकत्व ठेवू शकत नाहीत. त्यामुळे अक्षय कुमार भारतात मतदान करु शकणार नाही.
- बॉलिवूडची सर्वात जास्त लोकप्रिय असलेली आणि सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री दीपिका सुद्धा या यादीत आहे. तिचे वडील जरी भारतीय असले तरी दीपिकाचा जन्म डेनमार्कच्या कोपनहेगनमध्ये झाला होता. तिच्याकडे डॅनिश पासपोर्ट आहे.
- अभिनेत्री कतरिना कैफचे वडील कश्मीरी आहेत. पण कतरिनाचा जन्म हॉंगकॉंगमध्ये झाला होता आणि तिच्याकडे ब्रिटीश पासपोर्ट आहे. त्यामुळे इच्छा असूनही ती भारतात मतदान करु शकत नाही.










