NZ W vs SA W : मॅरिझॅन कॅपने गाठला ऐतिहासिक टप्पा, वनडे क्रिकेटमध्ये रचला नवा विक्रम!

Marizanne Kapp Hits 155 ODIs Milestone : आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज अष्टपैलू खेळाडू मॅरिझॅन कॅपने इतिहास रचला आहे. ती आता दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक वनडे सामने खेळणारी महिला क्रिकेटर ठरली आहे. तिने ही कामगिरी इंदूर येथील होळकर क्रिकेट स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात केली.
मॅरिझॅन कॅपने या सामन्यात आपल्या कारकीर्दीचा १५५ वा वनडे सामना खेळला आणि दक्षिण आफ्रिकेच्या माजी कर्णधार मिग्नॉन डु प्रीझचा विक्रम मोडला. डु प्रीझने कारकीर्दीत१५४ वनडे सामने खेळले होते. या विक्रमसह कॅपने दक्षिण आफ्रिकन क्रिकेट इतिहासात नवीन अध्याय जोडला आहे. तसेच, ती महिला वनडे क्रिकेट इतिहासात सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सातव्या स्थानावर पोहोचली आहे.
🏏 **HISTORY MADE!** Marizanne Kapp becomes South Africa’s most capped player in women’s ODIs! 🔥 She’s now played 155 matches, edging out Mignon du Preez’s 154. What a legend! 🇿🇦 #MarizanneKapp #CWC25 #SAvNZ #Indore #WillToWin #Unbreakable #WomensCricket #Cricket pic.twitter.com/NGVQaTMM2s
— lightningspeed (@lightningspeedk) October 6, 2025
मॅरिझॅन कॅप आपल्या अष्टपैलू प्रदर्शनासाठी ओळखली जाते. तिने २००९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि तेव्हापासून ती संघाची सर्वात विश्वासू खेळाडू म्हणून ओळखली जाते. तिचा अनुभव आणि कामगिरी दक्षिण आफ्रिकन संघासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे.
हेही वाचा – Bernard Julien : वेस्ट इंडिजचा दिग्गज हरपला; वयाच्या ७५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
वनडे मध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या महिला क्रिकेटपटू :
- मिताली राज (भारत) – २३२ सामने
- झूलन गोस्वामी (भारत) – २०४ सामने
- शार्लोट एडवर्ड्स (इंग्लंड) – १९१ सामने
- सूजी बेट्स (न्यूझीलंड) – १७३ सामने
- स्टेफनी टेलर (वेस्ट इंडीज) – १७० सामने
- एलिस पेरी (ऑस्ट्रेलिया) – १५९ सामने
- मॅरिझॅन कॅप (दक्षिण आफ्रिका) – १५५ सामने
- सोफी डिव्हाइन (न्यूझीलंड) – १५४ सामने
हेही वाचा – Sidra Amin : पाकिस्तानच्या खेळाडूला ‘ती’ कृती भोवली! भारत-पाक सामन्यानंतर आयसीसीने केली कारवाई
न्यूझीलंडने दिले २३२ धावांचे लक्ष्य –
वर्ल्ड कपच्या या सामन्यात न्यूझीलंडच्या कर्णधार सोफी डिव्हाइनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कीवी संघाने ४७.५ षटकांत २३१ धावांपर्यंत मजल मारली आणि सर्वबाद झाला. कर्णधार सोफी डिव्हाइनने शानदार फलंदाजी करत ८५ धावांची खेळी साकारली. तिच्याशिवाय ब्रूक हॉलिडेने ४५ धावा आणि सलामीवीर जॉर्जिया प्लिमरने ३१ धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी उत्तम प्रदर्शन केले, ज्यात नॉनकुलुलेको म्लाबा सर्वाधिक यशस्वी ठरली. तिने १० षटकांत ४० धावा देत ४ विकेट्स घेतल्या.





