मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा हिचा 2019 मध्ये प्रदर्शित झालेला ड्रीम गर्ल हा चित्रपटही चांगलाच गाजला होता. लवकरच आता या चित्रपटाचा दूसरा भाग देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मात्र या भागामध्ये नुसरतच्या जागी अभिनेत्री अनन्या पांडे दिसणार आहे. अभिनेता आयुष्मान खुराना आणि अनन्याची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. मात्र एका मुलाखतीमध्ये नुसरतला चित्रपटात न घेण्यामागचे कारण विचारले. त्यावर ती म्हणाली की, “तुम्ही हा प्रश्न निर्मात्यांना विचारला पाहिजे. त्यांनी मला का चित्रपटात का घेतलं नाही.हे मला त्यांना विचारण्याची अजिबात इच्छा नाही आणि मी विचारलेही नाही. जर त्यांनी मला घेतले नाही तर ठीक आहे. आता मी प्रत्येक गोष्ट स्वीकारू लागली आहे. त्यामुळे मी सत्य स्वीकारले आहे आणि मला त्याबद्दल कोणतीच चिंता नाही.” या चित्रपटात आयुष्मान खुरानासह अनन्या पांडे, असरानी, परेश रावल, मनजोत सिंग, राजपाल यादव, सीमा पाहवा, मनोज जोशी, अभिषेक बॅनर्जी आणि विजय राज देखील दिसणार आहेत. नुसरत भरुचाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच ‘छोरी 2’ मध्ये दिसणार आहे, या चित्रपटाचेही शूटिंग पूर्ण झाले आहे.