Nupur Stebin: नववधू नूपुर सेननचा रॉयल अंदाज; रिसेप्शनमध्ये स्टेबिन बेनसोबतची केमिस्ट्री ठरली चर्चेचा विषय

Nupur Stebin: बॉलिवूड अभिनेत्री कृति सेननची धाकटी बहीण नूपुर सेनन आणि प्रसिद्ध गायक स्टेबिन बेन यांच्या लग्नानंतर मुंबईत पार पडलेली रिसेप्शन पार्टी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. ११ जानेवारी २०२६ रोजी उदयपूरमध्ये विवाहबंधनात अडकलेल्या या जोडप्याने १३ जानेवारीला मुंबईत भव्य रिसेप्शन आयोजित केलं होतं.
या रिसेप्शनला चित्रपटसृष्टी आणि संगीतविश्वातील अनेक नामवंत कलाकार उपस्थित होते. या खास संध्याकाळी नूपुर आणि स्टेबिन यांनी त्यांच्या स्टायलिश लूक आणि प्रेमळ केमिस्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
नूपुर सेननचा रॉयल आणि देसी टच असलेला लूक
रिसेप्शनसाठी नूपुर सेननने मरून रंगाचा ऑफ-शोल्डर गाउन परिधान केला होता. या गाउनसोबत असलेली सिक्वेन्स वेल तिच्या लूकला अधिकच रॉयल बनवत होती. मॉडर्न गाउनसोबत नूपुरने देसी टच जपला होता. गळ्यात मंगळसूत्र, हातात लाल चुडा आणि भांगात सिंदूर यामुळे तिचा नववधूचा लूक अत्यंत देखणा आणि सोज्वळ दिसत होता.

स्टेबिन बेनचा ऑल-ब्लॅक रॉयल लूक
नूपुरने स्मोकी आय मेकअप, सटल लूक आणि स्लीक बन हेअरस्टाईलने आपला लूक पूर्ण केला होता. हातावरची गडद मेंदीही तिने खास दाखवली, ज्यामध्ये स्टेबिनचं नाव स्पष्ट दिसत होतं. दरम्यान, स्टेबिन बेन काळ्या रंगाच्या शेरवानीत खूपच डॅशिंग दिसत होते. त्यांचा ऑल-ब्लॅक रॉयल लूक चाहत्यांना विशेष भावला.
View this post on Instagram
कपलची खास केमिस्ट्री
रिसेप्शनदरम्यान नूपुर आणि स्टेबिन यांची केमिस्ट्रीही सर्वांच्या लक्षात आली. एका खास क्षणी स्टेबिन नूपुरचा गाउन सावरताना दिसले आणि हा प्रेमळ क्षण चाहत्यांच्या मनाला भिडला. या सोहळ्यात कृति सेननही हिरव्या व्हेलवेट साडीत अतिशय सुंदर दिसत होती. तिने बहिण आणि जीजासोबत अनेक फोटो काढले.
एकूणच, नूपुर सेनन आणि स्टेबिन बेन यांची रिसेप्शन पार्टी भव्य, ग्लॅमरस आणि प्रेमळ क्षणांनी भरलेली ठरली. त्यांच्या स्टाईलसह केमिस्ट्रीने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.





