Nupur Sanon Hindu Wedding: उदयपूरमध्ये हिंदू पद्धतीने सात फेरे, आधी ख्रिश्चियन नंतर हिंदू पद्धतीने लग्न

Nupur Sanon Hindu Wedding: अभिनेत्री कृति सेननची बहिण नूपुर सेननने आणि गायक स्टेबिन बेनने उदयपूरमध्ये हिंदू पद्धतीने सात फेरे घेतले आहेत. या जोडप्याचे लग्न काही दिवसांपूर्वी खाजगी ख्रिश्चियन वेडिंग सेरेमनीमध्ये झाले होते, आणि आता त्यांनी पारंपरिक हिंदू पद्धतीनेही विवाह केला.
लग्नाचे ठिकाण आणि सोहळा
नूपुर आणि स्टेबिनने उदयपूरच्या फेअरमॉन्ट हॉटेलमध्ये खाजगी सोहळा पार पाडला. या कार्यक्रमात फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. लग्नानंतर उपस्थितांनी त्यांच्या लग्नातील काही छोट्या क्षणांचे व्हिडिओ शेअर केले. या व्हिडिओत दोघे एकमेकांना वरमाळा घालताना आणि आनंदाने हसताना दिसत आहेत. लग्नानंतर आतिशबाजीने कार्यक्रम अधिक रंगीबेरंगी झाला.
दोन पद्धतीचा संगम
या जोडप्याने सगळ्यात आधी १० जानेवारी रोजी ख्रिश्चियन व्हाइट वेडिंग केली होती. त्यानंतर ११ जानेवारीला पारंपरिक हिंदू रीती-रिवाजानुसार सात फेरे घेतले. नूपुर आणि स्टेबिनच्या खाजगी लग्नात हळदी, मेहंदी, संगीत आणि इतर सर्व पारंपरिक पद्धतीचा समावेश होता.
View this post on Instagram
नूपुर आणि स्टेबिनची भेट म्युझिक इंडस्ट्रीमध्ये काम करताना झाली होती. नंतर त्यांनी एकत्र म्युझिक व्हिडिओसाठी काम केले, जिथे त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली. एकमेकांशी वेळ घालवत त्यांनी डेटिंग सुरु केली आणि हळूहळू त्यांचा नातं मजबूत झालं.





