NTA महासंचालक सुबोध कुमार सिंह यांना सरकारने पदावरुन हटवलं
Updated On:

नवी दिल्ली : NEET परीक्षेतील गोंधळानंतर केंद्र सरकारकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. NTA महासंचालक (DG) सुबोध कुमार सिंह यांना सरकारने पदावरुन हटवलं आहे. त्यांच्या जागी माजी केंद्रीय सचिव प्रदीप सिंह खरोला यांच्याकडे राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या (NTA) महासंचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. NEET पेपर लीक प्रकरण आणि परीक्षा रद्द प्रकरण सुबोध कुमार यांना चांगलंच भोवलं आहे.





