“धर्म किंवा राज्याप्रती असलेल्या निष्ठेशी तडजोड…”; अजित डोवाल यांचे महत्वपूर्ण विधान

NSA Ajit Doval । राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल यांनी “कोणीही आपल्या धर्म आणि राज्याप्रती असलेल्या निष्ठेशी कसलीही तडजोड करू नय” असे म्हटले आहे. अहमद टी कुरु यांच्या ‘इस्लाम, ऑथरिटेरियनिझम अँड अंडर डेव्हलपमेंट’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना डोवाल बोलत होते.
पुस्तक प्रकाशनच्या कार्यक्रमात अजित डोवाल यांनी,”राज्य आणि धर्म यांच्यातील संबंध ही इस्लाममध्ये एक अद्वितीय घटना नाही. इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ही संकल्पना बदलली आहे. तसेच अब्बासी राजवटीत राज्य आणि इमामांच्या भूमिकेबाबत स्पष्टता होती” असेही म्हटले आहे.
ज्या पिढ्या चौकटीबाहेर विचार करू शकत नव्हत्या NSA Ajit Doval ।
हिंदू धर्माचा संदर्भ देताना अजित डोभाल यांनी,” हिंदू धर्मात ध्यानाद्वारे वाद सोडवले जात होते आणि सामाजिक वाद संवादाद्वारे सोडवले जात होते. मात्र ज्या पिढ्या चौकटीबाहेर विचार करू शकत नव्हत्या त्या स्थिर झाल्या.” असे त्यांनी सांगितले.
प्रिंटिंग प्रेसचे उदाहरण
डोवाल यांनी एका प्रिंटिंग प्रेसचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, प्रिंटिंग प्रेस स्वीकारण्यास होणारा विरोध हे एक उदाहरण आहे जिथे इमाम समुदायाकडून विरोध झाला होता. त्यांना वाटले की प्रिंटिंग प्रेसच्या आगमनाने, इस्लामचा खरा अर्थ जो तो मानत होता तो आता योग्यरित्या उलगडता येणार नाही. त्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. मात्र कालांतराने याचा स्वीकार करण्यात आला.
धर्म किंवा राज्याप्रती असलेल्या निष्ठेशी तडजोड करू नये
पुढे बोलताना डोभाल म्हणाले की, “राज्ये आणि समाजांनी आत्मपरीक्षण करणे खूप महत्वाचे आहे. धर्म किंवा राज्याप्रती असलेल्या निष्ठेशी तडजोड केली जाऊ नये. आपण आपल्या मनांना कैद होऊ देऊ नये. जर तुम्ही आत्मपरीक्षण केले नाही तर तुम्ही वेळ आणि दिशा गमावाल. जर तुम्ही ते खूप उशिरा केले तर तुम्ही मागे पडाल. कोणताही विचार किंवा विचारसरणी स्पर्धात्मक असली पाहिजे, परंतु समाजातील अशा परस्परविरोधी मानसिकतेचे निराकरण आपण कसे करतो हे महत्त्वाचे आहे.”असे म्हटले .
एमजे अकबर काय म्हणाले? NSA Ajit Doval ।
अहमद टी कुरु यांच्या या पुस्तकाच्या प्रकाशनाला माजी केंद्रीय मंत्री एमजे अकबर देखील उपस्थित होते. ते म्हणाले की, मुस्लिम लोकशाही देशांमध्ये राहतात, परंतु त्यांना आधुनिकीकरण आणि राज्य समजून घेण्यात अडचणी येत आहेत.





