शनिदेवावर आता ब्रॅण्डेड तेलाचाच अभिषेक करता येणार; आजपासून अंमलबजावणी सुरू

Shanishinganapur Shani Temple | शनिशिंगणापूर येथील शनिदेवाच्या दर्शनासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. यावेळी पूजा अर्चना करून शनिदेवावर तेलाचा अभिषेक केला जातो. मात्र काही दिवसांपूर्वी मंदिर ट्रस्टने एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्याची अंमलबजावणी आज 1 मार्चपासून होणार आहे.
शनिदेवाच्या शिळेवर आजपासून ब्रँडेड तेलाचाच अभिषेक करता येणार आहे. यापुढे आता सुट्या तेलावर बंदी घातली असून केवळ रिफाइन्ड आणि शुद्ध तेल चढवण्यास परवानगी असणार आहे.
हा निर्णय घेण्यामागचे कारण काय?
शनि देवाच्या शिळेची झीज होऊ नये म्हणून शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायतने हा निर्णय घेतला आहे. हा आदेश 1 मार्चपासून लागू झाला आहे. मंदिराच्या ट्रस्टींनी याविषयीची माहिती दिली आहे. शिंगणापूर येथे शनिदेवाच्या मूर्तीवर तेल अभिषेक करण्याची परंपरा आहे. Shanishinganapur Shani Temple |
भेसळयुक्त तेलाने अभिषेक होत असल्याने शनिदेवाची स्वयंभू मूर्ती खराब होत असल्याचे ग्रामस्थ आणि देवस्थान ट्रस्टचे म्हणणे आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. सुटे व भेसळयुक्त तेलामुळे शनिमूर्तीची भविष्यात होणारी झीज थांबली जाणार असल्याने देवस्थानच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.
शनेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाच्या बैठकीत 1 मार्च 2025 पासून फक्त ब्रँडेड आणि शुद्ध रिफायनरी खाद्य तेलानेच अभिषेक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबतची माहिती आणि आदेश मंदिर परिसरात असलेल्या व्यावसायिक, दुकानदारांना बजावले आहे. Shanishinganapur Shani Temple |
दरम्यान, शनिमूर्तीला अर्पण करण्यासाठी भाविक वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यतेल, सुटे तेल किंवा मिश्रित तेल आणतात. मात्र अन्न व भेसळ तपासणी अहवालानुसार, काही तेलांमध्ये भेसळ असल्यामुळे शनिदेवाच्या मूर्तीवर परिणाम होत असल्याचे समोर आले. भेसळीच्या तेलामुळे मूर्तीच्या पृष्ठभागाची झीज वाढत आहे. त्यामुळे देवस्थान समितीने कठोर पावले उचलत केवळ नामांकित ब्रँडेड तेलच वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा:
Jio- Airtel पाठोपाठ आता ‘या’ कंपनीने सुरू केली 5G सेवा, मुंबईतून चाचणीला सुरुवात





