श्री.क्षेत्र शनिशिंगणापूर ते पंढरपूर पालखीचे प्रस्थान

शनिशिंगणापूर – टाळ-मृदंगाचा गजर, भाविकांच्या खांद्यावर पतका, पुष्पफुलांनी सजविलेला रथ, महिला वारकऱ्यांचे डोक्यावर तुळशी वृंदावन, मुखी विठू नामाचा गजर करीत माऊलीच्या नामस्मरणात श्री.क्षेत्र शनिशिंगणापूर येथील महंत उदासी महाराज पायी दिंडीचे मोठ्या उत्साहात पंढरपूरकडे प्रस्थान झाले.
प्रारंभी सोहळ्याचे पूजन हभप विश्वासराव गडाख यांच्या ्रहस्ते तर पादुकापूजन उपाध्यक्ष विकास बानकर व राज्य पोलीस पाटील संघटनेचे राज्य सदस्य ऍड.सयाराम बानकर,अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर व विश्वस्त मंडळाच्या हस्ते करून भाविकांच्या प्रमुख उपस्थितीत दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले.
या दिंडीचे ठिकठिकाणी स्वागत करून जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. जवळजवळ 700 हून अधिक महिला, पुरुष वारकरी सहभागी होऊन देवस्थान समितीचे पदाधिकारी आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सज्ज झाले आहेत. माजी उपाध्यक्ष सुरेश बानकर, हभप.पंढरीनाथ शेटे, माजी विश्वस्त रावसाहेब शेटे, हभप.अतुल महाराज आदमाने, हभप.पंडित महाराज, अॅड.पोलिस पाटील, सयाराम बानकर, रमेश डोळे उपस्थित होते. मागील वर्षापासून राज्य शासन निर्णयानुसार सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने डॉ.सुनील वाघ, डॉ.रमेश जावळे, डॉ.विलास एळवंडे यांनी भाविकांसाठी प्रथमच उपचार किट दिली.





