Harshvardhan Sapkal : “…आता ‘नरेंद्र सरेंडर’ म्हणण्याची वेळ आली आहे”; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असं का म्हणाले?
Harshvardhan Sapkal : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी मोठं वक्तव्य केले आहे. यासोबत त्यांनी केंद्र सरकरवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे.

Harshvardhan Sapkal : शेतमालाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी कळमनुरी ते हिंगोली दरम्यान आयोजित पदयात्रेत माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवत “देशाच्या परिस्थितीकडे पाहता आता ‘नरेंद्र सरेंडर’ म्हणण्याची वेळ आली आहे,” असे मोठं वक्तव्य केले आहे. तसेच त्यांनी केंद्र सरकावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून इराण-इस्राइल संघर्षामुळे जगातील अनेक देशांची डोकेदुखी वाढली आहे. भारताला देखील या संघर्षाची झळ बसू लागली आहे. इराणच्या नाकेबंदीमुळे भारताला होणारा एलपीजी पुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरांत ६० रुपयांची वाढ झाली आहे, तर व्यावसायिक गॅस ११६ रुपयांनी महाग झाले आहेत. यामुळे सर्वसामन्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. याच पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. Harshvardhan Sapkal
सपकाळ नेमकं काय म्हणाले? (Harshvardhan Sapkal)
“अमेरिकेसोबत केलेल्या करारामुळे शेती व्यवसायाची पीछे हाट होतानाचे चित्र आहे. आंतरराष्ट्रीय धोरण ठीक नसल्याने इंधनासारख्या समस्या देशामध्ये निर्माण झालेल्या आहेत. केंद्र सरकार योग्य पद्धतीने काम करत नसल्याने हा आक्रोश आहे. सिलेंडरच्या किमती वाढलेल्या आहेत. इंधनाचा देखील तुटवडा निर्माण होऊ शकतो. ‘नरेंद सरेंडर’ म्हणण्याची वेळ आलेली आहे, याबद्दल मी दुःख व्यक्त करतो.”
खंतांचीही टंचाई निर्माण होण्याची शक्यता Harshvardhan Sapkal
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष असाच सुरु राहिल्यास त्याचा विविध क्षेत्रांवर परिणाम होऊ शकतो. इंधनाची देखील मोठ्या प्रमाणावर टंचाई निर्माण होऊ शकते. कृषी क्षेत्राला झळ बसू शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. खतांचीही टंचाई होण्याची शक्यता आहे. खतांची मोठी वाहतूक होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होते.

Harshwardhan Sapkal
खतांच्या जागतिक व्यापारामधली ३३ टक्के वाहतूक इथून होते. त्यामुळे खतांचा पुरवठा विस्कळीत झाल्याने भारतासह विविध देशांना त्याचा फटका बसेल, असा इशारा अभ्यासकांनी दिला आहे. धान्य उत्पादनात घट झाल्यास किंमती गगनाला भिडतील अशी भीती सुद्धा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : Natural Drinks: उन्हाळ्याची चाहूल! त्वरित ऊर्जा देणारी ही ५ नैसर्गिक पेये ठेवा आहारात





