Manoj Jarange Patil : आता प्रत्येक गावात एक मुलगा…; मनोज जरांगेंचा पुढचा प्लॅन काय?

Manoj Jarange Patil : आता प्रत्येक गावात एका सेवकाची नियुक्ती केली जाणार असल्याची मोठी घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. जरांगे हिंगोलीत बोलत होते. ते म्हणाले नुसती गर्दी आणि मोठ्या सभेतून आपल्या समस्या सुटणार नाहीत. गावात येणारी अडचण सांगायला हक्काचं ठिकाण आपल्याला द्यावं लागणार आहे. त्यासाठी गावात एक मुलगा द्यावा लागेल, असं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितलं.
मनोज जरांगेंचा पुढचा प्लॅन काय?
मनोज जरांगे म्हणाले, 22 फेब्रुवारी ते 22 मार्च आपल्याला काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. आपण एक आलो तर राहिलेले आरक्षण पण मिळेल. नुसती गर्दी आणि मोठ्या सभेतून आपल्या समस्या सुटणार नाहीत. गावात येणारी अडचण सांगायला हक्काचं ठिकाण आपल्याला द्यावं लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक गावात एक सेवक द्यावा लागणार आहे. त्याला संपूर्ण गाव अडचणी सांगेल, त्यासाठी एक महिना आपण ते काम करत आहोत, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले, आरक्षण मिळालं असं ग्राह्य धरा ते मिळणार आहे. आपल्याला आपले मूळ व्यवसायकडे वळवायचे आहे, त्यासाठी आपण काम करतोय. लाखात कोटीत समाज एकत्र आला. मात्र आपण गरिबांसाठी काम करु शकलो नाही तर आपण एकत्र येऊन फायदा नाही, असंही मनोज जरांगे यावेळी म्हणाले.
आरक्षणसाठी मराठ्यांनी एकत्र येणे काळाची गरज : मनोज जरांगे
जातीवाद निर्माण करण्यासाठी नव्हे तर गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, त्यांच्या आरक्षणसाठी मराठ्यांनी एकत्र येणे काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. तुम्ही मराठा, कुणबी असा भेदाभेद करू नका, एकमेकांच्या सुख- दुख्खात सहभागी व्हा, कुणी तुमच्यावर अन्याय केला तर सहन करू नका पण दुसऱ्यावर देखील अन्याय करू नका असा उपदेश मनोज जरांगे यांनी मराठा समाज बांधवाना केला.
लोणार तालुक्यातील शिंदी येथे छत्रपती शिवाजी महाराज ट्रस्ट आणि शिवप्रेमींच्या संयुक्त पुढाकारराने शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. काल (दि. १७) या आकर्षक पुतळ्याचे अनावरण मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते जाहीर सभेत बोलत होते.




