नाशिकचे पोलीस आयुक्त पांडेंना नोटीस; “त्या’ पत्राप्रकरणी गृहमंत्रालयाकडून कारवाई
Updated On:

नाशिक – नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांना महसूल संदर्भातील वादग्रस्त पत्राप्रकरणी गृह विभागाने “कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. या वादग्रस्त पत्राचे पडसाद मंत्रिमंडळ बैठकीतही उमटले आहेत. याप्रकरणी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी महसूल विभागातील अधिकाऱ्यांसह महसूल यंत्रणेवर गंभीर आरोप करत त्यांचे अधिकार काढून घेण्याबाबत पोलीस महासंचालकांना पत्र पाठविले होते.
या पत्रामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. या वादग्रस्त पत्राबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी व्यक्त केली. दरम्यान, दीपक पांडे हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय पोलीस अधिकारी मानले जातात.





