भाजपचे पक्ष प्रवेश काही केल्या थांबेनात! पुन्हा शिंदेंना बालेकिल्ल्यात धक्का; दोन प्रभावी नेत्यांच्या हाती ‘कमळ’

मधल्या काळात शिंदेंच्या सेनेतील अनेक मोठ्या पदाधिकाऱ्यांना भाजपने आपलेसे केले. निवडणुकांच्या धामधूमीतच एकनाथ शिंदे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. या भेटीत त्यांनी आपली नाराजी शहांपुढे व्यक्त केली. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत कलह थांबेल अशी आशा असतानाच पुन्हा एकदा बालेकिल्ल्यातच शिंदेंना भाजपने धक्का दिला आहे.
बुधवारी देसले आणि थरवळ यांचा पक्ष प्रवेश भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला. चव्हाण हे कल्याण-डोंबिवली पट्ट्यात शिंदे समर्थकांना लक्ष्य करत असल्याचे चित्र यामुळे पाहायला मिळत आहे. या सलग फोडाफोडीमुळे शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती. अशातच पुन्हा एकदा दोन प्रभावी नेत्यांना पक्षात प्रवेश दिल्याने शिंदेसेनेते अस्वस्थता पसरल्याची चर्चा आहे. या मोठ्या राजकीय घडामोडीमुळे पुन्हा एकदा भाजप-शिवसेना आमने सामने आली आहे.
शिंदेसेनेत अस्वस्था ?
शिंदे गटाचे महेश पाटील पक्षात दाखल झाल्यानंतर भाजपने मलंगगड, २७ गावातील स्थानिक पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. शिंदे गटातील आमदार राजेश मोरे आणि शहरप्रमुख राजेश कदम यांनी बुधवारी पत्रकार घेतली होती. या पत्रकार परिषदेतून मोठे दाव करण्यात आले होते. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. पत्रकार परिषदेच्या तासभरातच शिंदे गटाचे नेते सदानंद थरवळ यांचे सुपुत्र अभिजीत थरवळ यांचाही भाजपात प्रवेश देण्यात आला. त्यामुळे भाजपचे पक्ष प्रवेशाचे सत्र काही केल्या थांबत नसल्याने शिंदेसेनेत प्रचंड अस्वस्था पसरली आहे.





