Ram Temple theft: सॉक्समध्ये लपवल्या नोटा, CCTV ने उघड केला राम मंदिरातील घोटाळा
Ram Temple theft मीडिया रिपोर्ट्सनुसार, राम मंदिरातील पिलग्रिम फॅसिलिटी सेंटरमधील तब्बल ४५ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. या तपासात देणगीची रक्कम मोजणाऱ्या किमान पाच कर्मचाऱ्यांनी पैशांच्या ढिगाऱ्यातून नोटांची बंडले लपवून स्वतःच्या कपड्यांमध्ये किंवा सॉक्समध्ये ठेवली, असे फुटेजमध्ये दिसून आल्याचा दावा करण्यात आला आहे.

Ram Temple theft: अयोध्येतील राम मंदिराच्या देणगी अपहार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये देणगीची रक्कम मोजणारे काही कर्मचारी नोटांची बंडले चोरून ती कपड्यांमध्ये आणि सॉक्समध्ये लपवत असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. या प्रकरणामुळे राम मंदिरातील सुरक्षा व्यवस्था आणि देणगी व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राम मंदिरातील पिलग्रिम फॅसिलिटी सेंटरमधील तब्बल ४५ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. या तपासात देणगीची रक्कम मोजणाऱ्या किमान पाच कर्मचाऱ्यांनी पैशांच्या ढिगाऱ्यातून नोटांची बंडले लपवून स्वतःच्या कपड्यांमध्ये किंवा सॉक्समध्ये ठेवली, असे फुटेजमध्ये दिसून आल्याचा दावा करण्यात आला आहे.
या प्रकरणात श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या तक्रारीनंतर २५ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी अविनाश शुक्ला, लवकुश मिश्रा, अनुकल्प मिश्रा, मनीष कुमार यादव, करुणेश पांडे, रामशंकर मिश्रा, टिनू यादव आणि सुभाष श्रीवास्तव या आठ जणांना अटक केली आहे. (Ram Temple theft)
तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींशी संबंधित विविध ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत आतापर्यंत सुमारे ८० लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच चोरीच्या पैशांतून मालमत्ता किंवा इतर संपत्ती खरेदी करण्यात आली आहे का, याचाही तपास सुरू आहे. (Ram Temple theft)
तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मंदिरात दररोज विविध दानपेट्यांमधून जमा होणारी रक्कम मोजण्यासाठी सुमारे ५० कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही कर्मचारी पैशांची मोजणी करत असतानाच नोटांची बंडले लपवत असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे, मंदिर प्रशासनाकडे केवळ ४५ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्यामुळे हा प्रकार नेमका किती दिवसांपासून सुरू होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (Ram Temple theft)

Ram Temple theft: सॉक्समध्ये लपवल्या नोटा, CCTV ने उघड केला राम मंदिरातील घोटाळा
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आठ आरोपींपैकी सहा जणांची नियुक्ती स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शिफारशीनुसार वाराणसीस्थित ‘सैनिक सिक्युरिटीज’ या मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या एजन्सीमार्फत करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या एजन्सीने आपण केवळ हाऊसकीपिंग कर्मचारी पुरवतो आणि कोणाला कोणते काम द्यायचे, याचा निर्णय संबंधित संस्था किंवा बँक घेत असल्याचे स्पष्ट केले आहे. (Ram Temple theft)
एजन्सीचे संचालक गौरव सिंग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, संबंधित कर्मचाऱ्यांची निवड एजन्सीने केलेली नव्हती. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून मिळालेल्या नावांनुसार आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या सर्व माहितीची कागदपत्रे तपास यंत्रणांकडे सादर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. अटक करण्यात आलेले काही आरोपी एकमेकांचे नातेवाईक असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच काही कर्मचारी ट्रस्टमधील पदाधिकाऱ्यांच्या ओळखीने नियुक्त करण्यात आल्याचीही माहिती तपासात पुढे आली आहे. त्यामुळे नियुक्ती प्रक्रियेतील पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Ram Temple theft)
तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मोजणी कक्षातील प्रवेश नियंत्रण आणि सुरक्षा व्यवस्था पुरेशी सक्षम नव्हती. कर्मचाऱ्यांची योग्य पडताळणी आणि तपासणी न झाल्यामुळे अशा प्रकारचा अपहार शक्य झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. याशिवाय या प्रकरणात बँकेच्या काही अधिकाऱ्यांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात आली असून त्यांच्याबाबतही चौकशी सुरू आहे.
सध्या या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडून (SIT) सुरू आहे. चोरीची रक्कम आणखी किती आहे, यामध्ये इतर कोणी सहभागी आहे का आणि संपूर्ण गैरव्यवहार किती मोठा आहे, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत.





