Dhamal 4 Box Office : एक दोन नव्हे तर 29 चित्रपटांना धोबीपछाड! पहिल्याच दिवशी धमाल 4 ची बंपर कमाई
Dhamal 4 Box Office : आगामी काही दिवसांत कमाईचे आकडे वाढणार असून विकेंडनंतर हा चित्रपट किती कमाई करतो हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dhamal 4 Box Office : अभिनेता अजय देवगणचा बहुप्रतिक्षित कॉमेडी चित्रपट ‘धमाल ४’ अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी त्याने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे.
इंद्र कुमार दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, पहिल्याच दिवशीच्या कमाईने अनेक चित्रपटांचे विक्रम मोडले आहेत.
सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘धमाल ४’ने पहिल्याच दिवशी तब्बल १३.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. अंतिम आकडेवारीत काहीसा बदल होण्याची शक्यता असली तरी सुरुवातीचे आकडे चित्रपटासाठी अत्यंत उत्साहवर्धक मानले जात आहेत. आगामी काही दिवसांत कमाईचे आकडे वाढणार असून विकेंडनंतर हा चित्रपट किती कमाई करतो हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
या दमदार ओपनिंगसह ‘धमाल ४’ हा यंदाच्या वर्षातील सहाव्या क्रमांकाचा सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. विशेष म्हणजे, पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने तब्बल २९ चित्रपटांना मागे टाकले आहे. यात रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ (१२ कोटी) आणि आलिया भट्टचा ‘अल्फा’ (९.२५ कोटी) यांसारख्या चित्रपटांचाही समावेश आहे.
हेही वाचा : Sharvari Wagh: उकडीचे मोदक की पुरणपोळी? शर्वरी वाघचं उत्तर ऐकून चाहत्यांनाही हसू आवरणार नाही
‘या’ चित्रपटांना टाकले मागे
याशिवाय ‘इक्कीस’, ‘हॅपी पटेल’, ‘राहु केतू’, ‘अस्सी’, ‘दो दिवाने शहर में’, ‘द केरळ स्टोरी २’, ‘गिन्नी वेड्स सनी’, ‘कृष्णावतारम पार्ट १’, ‘पती पत्नी और वो दो’, ‘चांद मेरा दिल’, ‘पेद्दी’, ‘है जवानी तो इश्क होना है’, ‘गव्हर्नर’ आणि ‘मैं वापस आऊंगा’ यांसारख्या चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईला ‘धमाल ४’ने मागे टाकले आहे.
इंद्र कुमार दिग्दर्शित ‘धमाल ४’मध्ये अजय देवगणसोबत रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफरी, संजय मिश्रा, रवी किशन, अंजली आनंद, ईशा गुप्ता आणि संजीदा शेख यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धमाल’ या सुपरहिट चित्रपटापासून सुरू झालेल्या या लोकप्रिय फ्रँचायझीचा चौथा भागही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.
हेही वाचा : pune: ‘पुनीत बालन ग्रुप’कडून पोलिसांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट






