केंद्रीय मंत्रिपदामध्ये रस नाही – श्रीकांत शिंदे
Updated On:

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी केंद्रीय मंत्रिपदामध्ये रस नसल्याची भूमिका मांडली. त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाकडून मंत्रिपदाच्या शर्यतीत ते नसतील असे जवळपास निश्चित मानले जात आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटातील कुणाची वर्णी लागणार याविषयी विविध अंदाज वर्तवले जात आहेत. मंत्रिपदासाठी श्रीकांत यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा सुरू आहे. त्यासंदर्भात श्रीकांत यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. कुणाला मंत्री बनवायचे याचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. मला मंत्रिपदाबाबत विचारणा झाल्यास बिल्कूल रस नसल्याचे मी सांगेन. पक्षकार्य करण्यात मला अधिक रस आहे, असे ते म्हणाले. शिंदे गटाने राज्यातील लोकसभेच्या ७ जागा जिंकल्या आहेत.





