3 इडियट्सच्या सिक्वेलसाठी नाही तर ‘या’ प्रोजेक्टसाठी राजू, फहरान आणि रॅंचो आले एकत्र ! चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला

मुंबई – नुकतंच सोशल मीडियावर 3 इडियट्सच्या सिक्वेलची चर्चा सुरू झाली आहे. करीना कपूर खानने आमिर खान, आर माधवन आणि शर्मन जोशी यांच्या पत्रकार परिषदेचा स्क्रीनशॉट शेअर करून 3 इडियट्सच्या सीक्वलबाबत भाष्य केलं होत. या सुपरहिट चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची बातमी कळताच चाहतेही खूश झाले. मात्र आता या स्क्रिनशॉटचे सत्य समोर आले आहे.आमिर,माधवन आणि शर्मन जोशी यांचा हा स्क्रिनशॉट नेमकं कशा बाबतचा होता याचा खुलासा झाला आहे.
अभिनेत्री करीना कपूर खानने अलीकडेच एक स्क्रीनशॉट शेअर केला आणि तिघे त्यावेळी 3 इडियट्सचा सिक्वेल तयार करत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. आमिर,माधवन आणि शर्मन या तिघांचा एकत्रित फोटो पाहून अनेकांना वाटलं की खरंच या चित्रपटाचा सिक्वेन्स येणार आहे. मात्र तस नाही हे तिघे एकत्र येण्यामागचं कारण काहीस वेगळं आहे.
View this post on Instagram
व्हिडिओच्या सुरुवातीला आमिर खान, आर माधवन आणि शर्मन जोशी यांच्याद्वारे होते जे एका पत्रकार परिषदेत बोलताना दिसतात. ते म्हणतात,”मला माहित आहे की तुम्ही लोक काय विचार करत असाल की अभिनेते, क्रिकेटपटूंच्या वेशात काय करताहेत ?.” यानंतर तिन्ही कलाकार पत्रकार परिषद घेण्यामागचा खरा उद्देश सर्वांना सांगतात.
आमिर खान, आर माधवन आणि शर्मन जोशी यांचा हा व्हिडिओ ड्रीम 11 ची जाहिरात आहे. तिन्ही कलाकार क्रिकेटबद्दल बोलत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आले आहे. या तिघांचेही म्हणणे आहे की, आजकाल क्रिकेटर्स खूप अभिनय करत आहेत. त्यामुळेच आता कलाकार क्रिकेट खेळतील अशी योजनाही त्यांनी आखली आहे.
View this post on Instagram
हा व्हिडिओ आर माधवनने शेअर केला आहे. यामध्ये तिन्ही कलाकार क्रिकेटर्सची मजेशीर पद्धतीने खिल्ली उडवतात. शेवटी, आमिर म्हणतो की आता अभिनेता आणि क्रिकेटर्स आमनेसामने असतील. यावरूनच हे तिघे कोणत्या चित्रपटासाठी नाही तर एका जाहिरातीसाठी एकत्र आले असल्याचे समजते.




