Mangesh Desai : नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेते मंगेश देसाई यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे ते चर्चेत आले आहेत. तारांगणला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी धर्मवीर ३ संदर्भात अपडेट दिली आहे. मंगेश देसाई यांना धर्मवीर 3 प्रेक्षकांच्या भेटीला येणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी आधी धर्मवीर, नंतर धर्मवीर २ आणि मी जर सिनेमा केला तर धर्मवीर 3 नाही तर ‘गुवाहाटी फाईल्स’ या नावाने सिनेमा करेल, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यामुळे आता या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे. मंगेश देसाई यांचा धर्मवीर हा चित्रपट बॅाक्स अॅाफिसवर हिट ठरला. हा चित्रपट शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित होता. २०२२ मध्ये धर्मवीर चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी काही आमदार आणि खासदारांसह उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. त्यानंतर धर्मवीर २ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत युती करत सत्ता स्थापन का केली? हे दाखवण्यात आले होते. आता प्रेक्षकांना धर्मवीर ३ चित्रपटात काय दाखविण्यात येणार याबद्दल चर्चा सुरू असतानाच मंगेश देसाई यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. नेमकं काय म्हणाले? दिग्दर्शक महेश मांजरेकर दिग्दर्शित पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान तारांगणला दिलेल्या मुलाखतीत मंगेश देसाई यांनी धर्मवीर 3 प्रेक्षकांच्या भेटीला येणार का? या प्रश्नावर उत्तर देताना, आधी धर्मवीर, नंतर धर्मवीर २ आणि मी जर सिनेमा केला तर धर्मवीर 3 नाही तर ‘गुवाहाटी फाईल्स’ या नावाने सिनेमा करेल. तसंच तो सिनेमा 2027-2028 या दरम्यान करेन. परंतु अजून या सिनेमाबाबत नक्की असं काहीच नाही. हेही वाचा : शिंदे सेनेतील नेत्याचे जावई शिवदीप लांडे पिछाडीवर; धडाकेबाज कामगिरीमुळे मिळाली ‘सिंघम’ म्हणून लोकप्रियता