Prajakta Mali : “स्वेच्छेने नव्हे, तर…”; प्राजक्ता माळीने घेतला मोठा निर्णय! म्हणाली “यापुढे मी…”
Prajakta Mali : वाढदिवसानिमित्त प्राजक्ताने मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर आणि तळजाई मातेचे दर्शन घेतले. मंदिराबाहेरील फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिने यापुढे पूर्णपणे व्हिगन जीवनशैली स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

Prajakta Mali : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्राजक्ता सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आज (८ ऑगस्ट) ती तिचा ३७वा वाढदिवस साजरा करत असून, यानिमित्ताने तिने सोशल मीडियावरून पोस्ट करत एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे.
वाढदिवसानिमित्त प्राजक्ताने मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर आणि तळजाई मातेचे दर्शन घेतले. मंदिराबाहेरील फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिने यापुढे पूर्णपणे व्हिगन जीवनशैली स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. मात्र हा निर्णय स्वेच्छेने नव्हे, तर आरोग्याच्या कारणास्तव घ्यावा लागल्याचेही तिने स्पष्ट केले.
पोस्टमध्ये प्राजक्ता म्हणाली, “आज सकाळी श्री सिद्धिविनायक आणि आई तळजाई मातेचे दर्शन घेतले. याच क्षणी मी पूर्णपणे व्हिगन होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मी स्वखुशीने नाही, तर नाईलाजाने घेत आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमुळे मला वारंवार कफाचा त्रास होत आहे. त्यामुळे यापुढे मी चहा किंवा कॉफीला नकार दिला, तर त्याचे आश्चर्य वाटून घेऊ नका. तामसिक पदार्थांना माझे शरीर नकारात्मक प्रतिसाद देत आहे. त्यामुळे आता मी क्रूरता-मुक्त जीवनशैली स्वीकारत आहे. मात्र काही खोटारड्या व्यक्तींसाठी नाही,” असे तिने मिश्कील शैलीत नमूद केले.
View this post on Instagram
प्राजक्ताच्या या निर्णयाचे चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात स्वागत होत असून, अनेकांनी तिच्या पोस्टवर वाढदिवसाच्या शुभेच्छांसह नव्या प्रवासासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. प्राजक्ता तिच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याबाबत नेहमीच जागरूक असल्याचे दिसून येते. ती अनेकदा बंगळुरू येथील ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ आश्रमाला भेट देत असते. व्यस्त शूटिंग शेड्यूलमधून वेळ काढत योग, सात्त्विक आहार, ध्यान आणि मौनव्रत यांसारख्या गोष्टींवर ती भर देताना दिसते. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत तिने नॉनव्हेज आहारापासून दूर राहिल्याचेही सांगितले होते.
Sanjeeda Shaikh : किलर लूकने साऱ्यांनाच घायाळ केलं! ‘टॉक्सिक’मधील ही अभिनेत्री नेमकी आहे तरी कोण?






