Jayant patil : जयंत पाटलांचे राजकीय भविष्याबाबत बोलण्याइतका मोठा नाही : चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले. पण जयंत पाटील यांचा राजकीय भविष्याबाबत बोलण्याइतका मोठा माणूस नाही, पण त्यांचे प्रश्न मार्गी लावणार असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.
दरम्यान बावनकुळे पुढे म्हणाले की, जयंत पाटील हे माझी वेळ घेऊन भेटायला आले होते. तिथे 400 ते 500 लोकं उपस्थित होती. आमच्यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. केवळ विकास कामांसंदर्भात चर्चा झाली. जयंत पाटील यांनी त्यांच्या सांगली जिल्ह्यातील विकासकामांबाबत चर्चा केली.
मी त्यांना आश्वासन दिले आहे की, येणाऱ्या अधिवेशनात त्यांच्या समस्यांच्या संदर्भात एक बैठक माझ्या दालनात लावणार आहे. यावेळी विकासकामांवर सविस्तर चर्चा झाली. जयंत पाटील यांनी सर्व विषय माझ्यासमोर मांडले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे त्यावेळी माझ्यासोबत होते.




