पुणे जिल्हा | खेडमध्ये एकही मतदानकेंद्र संवेदशील नाही

राजगुरूनगर (प्रतिनिधी) – शिरूर लोकसभा मतदारसंघातील खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील 385 मतदान केंद्रासाठी साहित्य पाठविण्याची तयारी पूणर्र् झाली आहे. खेड तालुक्यातील 385 मतदान केंद्रापैकी एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही.
रविवारी (दि. 12) हुतात्मा राजगुरू तालुका क्रीडा संकुलातुन मतदान साहित्य घेऊन 64 एस.टी.बसेस आणि 8 खासगी जीपमधून कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना होणार आहेत, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी दिली.
या सहा मतदान केंद्रावरचा मतदानाचा देखरेख आढाव्यासाठी पथक प्रमुख म्हणून गटशिक्षणाधिकारी अमोल जगंले कामकाज पहाणार आहेत. सर्व मतदान केंद्रावर आरोग्य किटसह ,पाणी, लाईट व्यवस्था, ठेवण्यात येणार असुन निवडणुकीची तयारी पुर्ण झाल्याची माहिती सहसहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली.
385 मतदान केंद्रासाठी 2375 कमर्चारी तर 400 कर्मचारी राखीव, व्हीव्हीपॅट, बॅलेट युनिट, ईव्हीएम मशीन तपासणी रॅडम पद्धतीने सीलबंद करुन 24 तास पोलीस बंदोबस्तात स्ट्राँगरुम ठेवण्यात आल्या आल्याची माहिती अपर तहसीलदार नेहा शिंदे, निवासी नायब तहसीलदार मदन जोगदंड यांनी दिली.
तालुक्यात 385 मतदान केंद्रासाठी 36 क्षेत्रिय अधिकारी दिलेल्या मतदान केंद्रावरची मतदानाची आकडेवारी दर दोन तासाला तालुका नियत्रंण कक्षाला कळविणार आहेत मतदान केंद्रावर सुरु झालेल्या मतदानावर कडक नजर ठेवणार आहेत.
मशीनमध्ये कोणाताही तांत्रिक बिघाड अथवा व्यत्यय आल्यास त्वरीत पर्यायी व्यवस्थेसाठी यत्रंणा सज्ज ठेवण्यात आली आहे. तालुक्यातील पश्चिम भागातील 3 गावांतील मोबाइल रेंजअभावी माहिती मिळण्यास अडचण येऊ, नये म्हणून रणर कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. क्षेत्रिय अधिका-याच्या सोबत राखीव कर्मचारी देण्यात येणार आहे.
त्यांना मतदान केंद्रावर मतदार स्लिप
उमेदवारांनी नेमलेल्या पोलिंग एंजटला वारंवार मतदान केंद्राबाहेर ये-जा करता येणार नाही, सर्व मतदारांना मतदार स्लिपांचे वाटप पुर्ण करण्यात आले असुन काही मतदान केंद्रातंर्गत मतदार कामानिमित्ताने बाहेरगावी असतील तर अशा मतदारांना मतदान केंद्रावर मतदार स्लिप देण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जोगेंद्र कट्यारे यांनी दिली.





