दिलबर गर्ल अभिनेत्री नोरा फतेही करोनाच्या विळख्यात
Updated On:

मुंबई – राज्यात करोनाच्या रुग्णात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून राजकीय नेत्यांना करोनाने घेरले असल्याच्या बातम्या माध्यमांवर झळकताना दिसून येत आहेत. असे असताना करोनाने बॉलिवूडमध्येही धुमाकूळ घातला आहे. अभिनेत्री नोरा फतेहीला करोनाची लागण झाली आहे.
बॉलिवूड कलाकारांना करोना असल्याच्या बातम्या एकापाठोपाठ एक इंडस्ट्रीमधून येत आहेत. नुकताच अभिनेता अर्जुन कपूरला करोना झाला होता, आता दिलबर गर्ल नोरा फतेहीही करोना पॉझिटिव्ह आढळली आहे. नोराच्या प्रवक्त्याने या बातमीची पुष्टी केली आहे. यावेळी त्यांनी सांगितले की नोरा सध्या क्वारंटाईनमध्ये आहे आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.





