मानलेल्या भावाच्या लग्नासाठी नोरा फतेही पोहोचली थेट कोकणात, रेल्वेने केला प्रवास; पाहा व्हीडिओ

Nora Fatehi Viral Video : अभिनेत्री नोरा फतेहीने तिच्या डान्सने सगळ्यांनाच वेडे केले आहे. अभिनेत्रीच्या गाण्यांचे, डान्सची प्रॅक्टिस करतानाचे व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. नुकताच नोराने तिचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, यात ती रेल्वेतून प्रवास करताना दिसत आहे. अभिनेत्रीने तिच्या मानलेल्या भावाच्या लग्नासाठी थेट कोकण गाठले आहे.
नोरा तिचा टीम मेंबर अनुपच्या लग्नासाठी रत्नागिरीला गेली होती. रेल्वे प्रवास करतानाचा व हळदी समारंभाचा व्हीडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हीडिओमध्ये नोरा कोणी ओळखू नये म्हणून मास्क लावून प्रवास करताना दिसत आहे.
आपल्या प्रवासाचा व्हीडिओ शेअर करत नोराने लिहिले की, ‘हा माझा रत्नागिरीतील लग्नाच्या हळदी समारंभासाठीचा छोटा व्लॉग! अनुपच्या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी ट्रेनने प्रवास केला. हा खूपच सुंदर अनुभव होता.’
View this post on Instagram
अनुपबद्दल सांगताने तिने लिहिले की, ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगते की, अनुप माझ्या आयुष्यात आणि टीमसोबत मागील 8 वर्षांपासून आहे. 2017 पासून तो कॅमेऱ्याच्या मागून माझा प्रवास कॅप्चर करत आहे. आता तो स्वतः कॅमेऱ्यासमोर आहे. अनूप आम्ही सर्व तुझ्यावर प्रेम करतो. तुला लग्नाच्या शुभेच्छा.’
View this post on Instagram
लग्नाला पोहोचलेल्या नोराचे अनुपच्या कुटुंबाकडूनही खास स्वागत करण्यात आले. त्याच्या घरच्यांनी तिला खास साडी देखील भेट दिली.
नोराचा हा मिनी व्लॉग व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्या टीममधील एका सदस्यासाठी नोराने रेल्वेमधून प्रवास करत थेट कोकण गाठल्याने यूजर्सकडूनही तिचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे.





