नोराच्या बोल्ड स्टायलिश लूकने फॅन्स घायाळ, म्हणतात ‘लव्ह ग्रीनरी’

मुंबई – नोराने आपल्या वेगळ्या लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. स्टायलिश हिरव्या रंगाच्या ड्रेसअपमध्ये अभिनेत्रीला पाहताच चाहत्यांना आनंद झाला आहे. नोराने यावेळी कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक किलर पोज दिल्या आहेत. ज्यामध्ये नोरा फतेहीचा स्टाईल पाहून चाहते अक्षरशः घायाळ झालेत. अभिनेत्री इतकी हॉट दिसत आहे की फोटोंवरून नजर हटत नसल्याच्या अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

अभिनेत्रीने घातलेल्या स्टायलिश ड्रेसमुळे तिचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.नोराच्या ड्रेसच्या डीपग्लेजमुळे ती आणखी बोल्ड दिसत आहे. हिरव्या रंगाच्या ड्रेसमुळे जणू ती निसर्गाचा भाग असल्यासारखी फॅन्सला वाटत आहे.

फोटोंमध्ये, नोरा खुल्या केसांसह हलक्या मेकअपमध्ये दिसली आहे, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. कॅमेऱ्यासमोर तीने अगदी साधी पोझ दिली आहे. तरीही फॅन्सने तिच्यावर कमेंटचा पाऊस पाडला आहे. फॅन्सने तिला लव्ह ग्रीनरी तर काहींनी गो ग्रीन अशा कमेंट केल्या आहेत. नोरा फतेही याआधी तिच्या गुलाबी साडीमुळे चर्चेत होती. या साडीसोबत अभिनेत्री फर पिंक कलरचा डीप नेक ब्लाउज परिधान करताना दिसली. अभिनेत्रीच्या या लूकची खूप चर्चा झाली होती.

नोरा फतेही सध्या नीतू कपूर आणि मर्सीसोबत ‘डान्स दिवाने ज्युनियर्स’ या डान्स रिअॅलिटी शोची सह-जज आहे. या शोच्या दिवशी अनेक व्हिडिओ आणि फोटो येत राहतात, ज्यामध्ये नोरा अतिशय ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.





