नोरा फतेही भावूक; मुंबई विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल

Nora Fatehi | अभिनेत्री नोरा फतेहीचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात ती भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केला आहे.
नोरा काळ्या कपड्यांमध्ये विमानतळावर आली होती. तिला पाहून काही चाहते जवळ आले, त्यावेळी तिच्या सुरक्षारक्षकाने एकाला दूर ढकलल्याचाही व्हिडीओ समोर आला आहे. नोराने डोळ्यांवर गॉगल लावला होता, तेव्हा ती रडत असल्याचं दिसत आहे.
View this post on Instagram
नोराचा हा व्हिडीओ समोर येण्याआधी अभिनेत्रीने इंस्टाग्राम स्टोरीवर एक धार्मिक वाक्य लिहिलं होतं – “इन्ना लिल्लाही वा इन्ना इलैही राजीऊन” या वाक्याचा अर्थ आहे, “आपण अल्लाहचेच आहोत आणि शेवटी त्याच्याकडेच परत जाणार आहोत”. त्यामुळे नोराच्या जवळच्या व्यक्तीचं निधन झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु नोराने याविषयी अधिकृत खुलासा केलेला नाही.
नोराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती नुकतीच ‘द रॉयल्स’ या वेबसीरिजमध्ये दिसली होती. यामध्ये तिच्यासोबत ईशान खट्टर, भूमी पेडणेकर, झीनत अमान, साक्षी तंवर, दिनो मोरिया आणि मिलिंद सोमण हे कलाकार होते.
हेही वाचा:
करीना कपूरचा ‘प्राडा’ला टोमणा; अस्सल कोल्हापुरी चप्पल दाखवत म्हणाली…





