ड्रेसमुळे नोरा फतेहीचे चालने झाले अवघड; लोकांनी केले ट्रोल

मुंबई – अभिनेत्री नोरा फतेही बॉलिवूडमध्ये डान्सिंग सेन्सेशन बनली आहे. अभिनेत्रीच्या अनोख्या नृत्यशैलीने चाहते थक्क झाले आहेत. याशिवाय नोरा तिच्या फॅशन सेन्ससाठी देखील चर्चेत आहे, परंतु अलीकडेच ती अशा ड्रेसमध्ये दिसली, ज्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे.
नोरा फतेही सध्या ‘डान्स दिवाने ज्युनियर्स’ या रिअॅलिटी शोची जज आहे. अलीकडेच अभिनेत्री या शोच्या सेटबाहेर स्पॉट झाली होती. यावेळी तिने निळ्या रंगाचा टाइट ड्रेस परिधान केलेला दिसला. यादरम्यान एक व्हिडिओही व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ड्रेसच्या लांबीमुळे तिला व्यवस्थित चालता येत नसल्याचे दिसून येत आहे. दोन लोकांनी तिचा ड्रेस जमिनीच्या वर उचलला होता, त्यानंतर ती चालायला लागली.
View this post on Instagram
अभिनेत्रीचा हा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी कमेंट करताना तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका यूजरने लिहिले की, हे काय नाटक आहे. दुसर्याने टिप्पणी केली, जेव्हा स्वतःचा ड्रेसचा सांभाळ करता येत नाही तर कशाला घालायचा. कपडे जमिनीला लागू नये यासाठी लोकं ठेवली. अशा मजेशीर कमेंट्स करत नोराला तिच्या ड्रेसवरून ट्रोल करण्यात आले आहे.





