कास्टिंग डिरेक्टरने बोलावले घरी आणि… Nora Fatehi ने स्वतः सांगितली ऑडिशनबाबतची घटना

बॉलीवूडच्या उत्कृष्ट डान्सर्सपैकी एक नोरा फतेहीला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. नोराने फार कमी वेळात इंडस्ट्रीत जे स्थान मिळवले आहे ते कौतुकास्पद आहे. मात्र, नूरासाठी परदेशातून भारतात येऊन केवळ बॉलिवूडमध्ये नाव कमावले नाही तर स्वत:ची ओळख निर्माण करणेही सोपे नव्हते. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, स्ट्रगलच्या दिवसांमध्ये तिला खूप नकार आणि अपमानाचा सामना करावा लागला होता. आज आम्ही तुम्हाला नोराच्या स्ट्रगलिंग डेजमधील एक किस्सा सांगणार आहोत, ज्याचा उल्लेख खुद्द नोराने एका मुलाखतीत केला होता.
नोराच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ती इंडस्ट्रीत नवखी होती तेव्हा तिला एका कास्टिंग डायरेक्टरने ऑडिशनच्या नावाखाली बोलावले होते. नोरा म्हणते की त्या महिला कास्टिंग डायरेक्टरने तिला घरी बोलावले आणि खूप काही ऐकवले. तुमच्यासारखे अनेक लोक इथे आहेत, तुमच्यासारख्या लोकांमुळे इंडस्ट्रीला कंटाळा आला आहे, आम्हाला तुमच्यासारखी माणसं नकोत’ असं त्या कास्टिंग डायरेक्टरने म्हटलं होतं. यानंतर नोराने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं स्वतः नोराने सांगितले .
नोराच्या म्हणण्यानुसार, तिला सुरुवातीला हिंदी कसे बोलावे हे देखील माहित नव्हते, त्यामुळे तिची खूप खिल्ली उडवली गेली. मात्र, बाहुबली चित्रपटातील आयटम साँगमध्ये दिसलेल्या नोराने त्यानंतर कधीही मागे वळून पाहिले नाही आणि आज तिची गणना इंडस्ट्रीतील टॉप डान्सर्समध्ये केली जाते.





