Nobel Prize : व्हिक्टर अॅम्ब्रोस आणि गॅरी रुवकून यांना वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरीबद्दल नोबेल पुरस्कार जाहीर

मुंबई : नुकतीच वैद्यकीय क्षेत्रातल्या नोबेलची घोषणा करण्यात आली असून व्हिक्टर अॅम्ब्रोस आणि गॅरी रुवकून यांना प्रतिष्ठीत पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. microRNA आणि त्याचे कार्य यावरील शोधामुळे त्यांना नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. शरीरातील अवयवांचा विकास आणि त्याचे कार्य यासाठी हा शोध महत्त्वाचा आहे असे नोबेल कमिटीने म्हंटले आहे.
BREAKING NEWS
The 2024 #NobelPrize in Physiology or Medicine has been awarded to Victor Ambros and Gary Ruvkun for the discovery of microRNA and its role in post-transcriptional gene regulation. pic.twitter.com/rg3iuN6pgY— The Nobel Prize (@NobelPrize) October 7, 2024
या वर्षी 7 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर या कालावधीत विज्ञान, अर्थशास्त्र, साहित्य आणि शांतता यांसारख्या क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या लोकांना नोबेल पारितोषिक प्रदान केले जाणार आहे. हे पुरस्कार स्टॉकहोम, स्वीडन या ठिकाणी दिले जाणार आहेत. दरवर्षी 11 दशलक्ष स्वीडिश क्रोनर म्हणजेच अंदाजे 8.90 कोटी रुपयांचे नोबेल पारितोषिक देण्यात येतात.
मागच्यावर्षी कोणाला मिळाला होता पुरस्कार?
गेल्या वेळी वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक कॅटलिन कॅरिको आणि ड्र्यू वेसमन यांना मिळाले होते. नोबेल पारितोषिकाची सुरुवात 1901 मध्ये झाली असून 2024 पर्यंत वैद्यकीय क्षेत्रातील 229 जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.





