नोबेल पुरस्कार विजेते डॉ. मोहम्मद युनूस बनले बांगलादेशचे नवे पंतप्रधान
Updated On:

ढाका – नोबेल पुरस्कार विजेते डॉ मोहम्मद युनूस हे बांगलादेशचे नवीन पंतप्रधान बनले आहेत. गुरुवारी संध्याकाळी त्यांनी देशाच्या हंगामी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. बांगलादेशचे अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी ‘बंगभवन’ या अध्यक्षीय प्रासादात आयोजित एका समारंभात ८४ वर्षीय युनूस यांना पदाची शपथ दिली.
या समारंभाला बांंगलादेशचे लष्करी, प्रशासकीय अधिकारी, उद्योग क्षे६तील काही निवडक मान्यवर आणि विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. अपेक्षेप्रमाणे डॉ. युनूस यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्तित होते. शपथविधीपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये डॉ. .नूस यांनी देशवासियांना संयमाचे आवाहन देखील केले.





