IPL 2025 : RCB ने केली नव्या कर्णधाराची घोषणा; ‘हा’ युवा खेळाडू सांभाळणार संघाची कमान

येत्या काही दिवसांत आयपीएलच्या 18 व्या सिझनला सुरुवात होणार आहे. त्याअगोदर आरसीबीच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. RCB ने आपल्या नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. आरसीबीने पत्रकार परिषदेत नवीन कर्णधाराचे नाव जाहीर केले. फ्रँचायझीने युवा खेळाडू रजत पाटीदारवर संघाची धुरा सोपवली आहे.
माजी कॅप्टन फाफ डू प्लेसिसनंतर रजत पाटीदार संघाचा कर्णधार झाला आहे. 2022 ते 2024 पर्यंत फाफ डुप्लेसिस या संघाचा कर्णधार होता. अशातच आता विराटला डावलून थेट रजत पाटीदार याच्याकडे फ्रँचायझीने कर्णधारपद सोपवले आहे. भविष्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचं फ्रेंचायझीने म्हटलं आहे. या हंगामात रजत पाटीदारला आरसीबीने 11 कोटी रुपयांना कायम ठेवलं होतं.
Welcome to your Raj, Ra-pa. 👑
The baton has been passed, and your name has made it to the history books.
It’s time for a new chapter! Let’s give the best fans in the world what they’ve been waiting for all these years. 🙌 #PlayBold #ನಮ್ಮRCB #RCBCaptain #Rajat #RajatPatidar… pic.twitter.com/AKwjM9bnsq
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) February 13, 2025
रजत पाटीदार 2023 मध्ये पुन्हा आरसीबी संघाचा भाग झाला होता आणि त्याला या फ्रँचायझीने 20 लाखांना खरेदी केलं होतं. त्यानंतर 2024 मध्येही त्याच पगारावर खेळला होता, या दोन्ही सिझनमध्ये त्याने चांगली कामगिरी केली. परंतु 2025 साठी त्याला या संघाने 11 कोटी रुपयांना कायम ठेवलं होतं. आता थेट कॅप्टन्सीची माळ त्याच्या गळ्यात पडली आहे. आरसीबीला गेल्या 17 वर्षात एकदाही आयपीएल जिंकता आली नाही. रजत पाटीदार संघाला पहिली आयपीएल ट्रॉफी मिळवून देण्यात यशस्वी होणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.





