“दिव्यांगाना कुणी कमजोर समजू नये, सरकारी नोकरीतील समावेश करावा…’; कळसूबाई शिखर चढून वेधले सरकारचे लक्ष !

वाघोली : सहा दिव्यांगानी सर्वोच्च कळसूबाई शिखर चढून दिव्यांग रोजगाराकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. तेथे मागणीचे फलकही त्यांनी फडकविले. सरकारी नोकरीतील दिव्यांग अनुशेष भरण्यात यावा व दिव्यांगांना व्यवसायासाठी कर्ज पुरवठा करण्यात यावा. अशी त्यांची मागणी होती.
शासनाकडे लेखी मागणी करूनही शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. शारीरिक व्यंगामुळे दिव्यांगाना कुणी कमजोर समजू नये ते आपल्या शारीरिक व्यंगावर मात करून सरकारी सेवेत चांगल्या पद्धतीने काम करतील. हे दाखवून देण्यासाठी कळसूबाई शिखर चाढल्याचे धर्मेंद्र सातव यांनी सांगितले.
या मोहिमेत सुप्रिया लोखंडे, बापू कोकरे, सिध्दराम माळी, दादा ठोंबरे, दादा काळूखे यांनी सहभाग घेतला होता. सरकारने तत्काळ दिव्यांगांचा नोकरीतील अनुशेष आरक्षण कोटा पूर्ण भरावा. कंत्राटी भरती मध्ये चार टक्के दिव्यांगांना नोकरी द्यावी. अपंग वित्त महामंडळ मधून व्यवसायासाठी दिव्यांगणा कर्ज द्यावे. या त्यांच्या मागण्या आहेत.





