भाजपला पुढील चाळीस वर्षे कोणी अडवूच शकत नाही : चंद्रकांत पाटील

Updated On:

मांजरी – भारतीय जनता पार्टीला नजीकच्या चाळीस- पन्नास वर्षात कोणी अडवूच शकत नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींना २२ कोटी मते मिळाली तेव्हा ३०३ जागा मिळाल्या आणि आता तर ४४ कोटी लोकांची बँक खाती उघडली आहेत .सात कोटी लोकांना स्वच्छतागृह दिली. तीन कोटी लोकांना पक्की घरे दिली आहेत आणि ८ कोटी लोकांना उज्वला गॅस जोड दिले आहेत.ज्या दिवसापासून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हापासून सामान्य माणसाच्या विकासाचा राहिलेला सर्व बॅकलॉग भरून काढण्याचे काम सुरू केले आहे. असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

मांजरी बुद्रुक येथे माजी उपसरपंच अमित आबा घुले यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन व वैकुंठ रथाचा लोकार्पण सोहळा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, औसा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे, नगरसेविका उज्वला जंगले,शहर उपाध्यक्ष भूषण तुपे, गणेश घुले, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे, सरचिटणीस संदीप लोणकर, मतदार संघाचे अध्यक्ष संदीप दळवी, महिला अध्यक्षा स्वाती कुरणे, अमर गव्हाणे, माजी सरपंच शिवराज घुले, जीवन जाधव, आण्णा धारवाडकर, प्रमोद कोद्रे, नितीन होले, प्रमोद सातव, स्मिता गायकवाड, वंदना कोद्रे, माजी नगरसेविका विजया वाडकर, भारतीय किसान संघाचे माऊली घुले, सुमित घुले, समीर घुले, बाळासाहेब घुले, सामाजिक कार्यकर्ते तुषार घुले , सारिका घुले आदींसह भाजपचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदींना माहिती आहे की सामान्य माणसाची गरज ही फक्त पोटाला अन्न नाही,तर त्याला याही स्थितीत हरिद्वार, काशी विश्वेश्वर,केदारनाथ, द्वारकेला जायचे आहे.त्यामुळे पुन्हा एकदा जगामध्ये जगतगुरु म्हणून आम्हांला पुढे यायचे आहे.आणि तेच काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. अमित आबांनी हे कार्यालय सुरू केले आहे. ते लोकांची गर्दी होणारे कार्यालय व्हावे.येथे आलेल्यांचे स्वागत व्हावे,लोकांची कामे मार्गी लावणारे अमित आबांचे जनसंपर्क कार्यालय व्हावे यासाठी पाटील यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

माजी आमदार योगेश टिळेकर म्हणाले की प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष करूनच मी आमदार झालो तसाच संघर्ष करून अमित घुले करत आहेत. अवघ्या पाच वर्षात कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून मांजरीत उड्डाण पूल, पेयजल योजना, मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते,स्ट्रीट लाईट अशी कामे केली.

जगदीश मुळीक म्हणाले की विकासाला पाठिंबा देणारा वर्ग मांजरी बुद्रुक मध्ये आहे.त्यामुळे याठिकाणी सर्वच भाजपचे नगरसेवक निवडून येतील. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी हे जनसंपर्क कार्यालय सदैव तत्पर राहील अशी ग्वाही यावेळी अमित आबा घुले यांनी दिली तसेच आगामी महापालिका निवडणुकीत याभागातून भाजपाचेच नगरसेवक निवडून जातील, असा विश्वासही अमित घुले यांनी प्रास्ताविकात व्यक्त केला. शैलेंद्र बेल्हेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर भूषण तुपे यांनी आभार मानले.
फोटो ओळी
मांजरी बुद्रुक : अमित घुले यांच्या जनसंपर्क कार्यालय उद्घाटनानंतर किसान संघाचे माऊली घुले, त्यांच्या पत्नी मिनाक्षी घुले यांचा सत्कार प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, अमित घुले उपस्थित होते.

आणखी संबंधित बातम्या

Giriraj Singh : हवामानविषयक वचनबद्धतेसाठी मजबूत प्रणाली आवश्यक; केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी व्यक्त केले मत

2026-08-23 22:00:39

Giriraj Singh : हवामानविषयक वचनबद्धतेसाठी मजबूत प्रणाली आवश्यक; केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी व्यक्त केले मत

Smriti Irani : आधी महिला आरक्षण लागू होऊ द्यावे; स्मृती इराणी यांचे राहुल गांधी यांना आवाहन

2026-08-23 19:26:20

Smriti Irani : आधी महिला आरक्षण लागू होऊ द्यावे; स्मृती इराणी यांचे राहुल गांधी यांना आवाहन

Narendra Modi : जगातील प्रतिभेला भारताकडे आकर्षित करा; अंतराळ स्टार्टअप्सना मोदींचे आवाहन

2026-08-23 17:09:45

Narendra Modi : जगातील प्रतिभेला भारताकडे आकर्षित करा; अंतराळ स्टार्टअप्सना मोदींचे आवाहन

PM Modi in BJP Meeting: 'मीही कधी तुमच्या जागी...' मोदींचा नव्या भाजप टीमला खास संदेश; साडेचार तासांच्या बैठकीत काय घडलं?

2026-08-23 13:37:37

PM Modi in BJP Meeting: 'मीही कधी तुमच्या जागी...' मोदींचा नव्या भाजप टीमला खास संदेश; साडेचार तासांच्या बैठकीत काय घडलं?

Sanjay Raut : "जर हा पेड इव्हेंट असेल तर मग लाडकी बहीण योजना काय होती?"; संजय राऊतांचा फडणविसांना सवाल

2026-08-23 13:10:46

Sanjay Raut : "जर हा पेड इव्हेंट असेल तर मग लाडकी बहीण योजना काय होती?"; संजय राऊतांचा फडणविसांना सवाल