स्व.निवृत्तीशेठ शेरकर यांची 95 वी जयंती साजरी उत्साहात साजरी

ओझर (वार्ताहर) : श्री विघ्नहर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. निवृत्तीशेठ नामदेव शेरकर यांच्या ९५ व्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. सर्व उपस्थित मान्यवर व सभासदांचे स्वागत चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी केले.कारखान्याचे संस्थापक चेअरमन व माजी खासदार स्व. निवृत्तीशेठ शेरकर यांची ९५ व्या जयंती निमित्त त्यांना शरद लेंडे, माऊली खंडागळे, संजय काळे, आशाताई बुचके, शरददादा सोनवणे या मान्यवरांनी विनम्र अभिवादन करुन शेठबाबा बद्दल विचार मांडले.
त्यामध्ये त्यांनी शेठबाबांनी कारखाना उभारणी साठी गावोगावी जाऊन शेअर्स गोळा केले. त्यावेळेच्या प्रतिकुल परिस्थिती मध्ये त्यांनी संचालक मंडळासह तालुक्यात पायी दौरे करुन शेतकर्यांना ऊस लागवडीसाठी प्रोत्साहीत करुन तालुक्यात ऊस क्षेत्राची वाढ केली. कारखाना चालवत असताना त्यांनी निस्वार्थीपणे काम करुन सभासद, ऊस उत्पादकांना नेहमीच उच्चांकी ऊस बाजारभाव देण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे तालुक्यातील शेतकर्यांचे जीवनमान उंचावले.विघ्नहर कारखान्याच्या रुपाने शेठ बाबांनी कामधेनु आणली. शेठ बाबांच्या कार्याचा वसा घेवून स्व.सोपानशेठ शेरकर यांनी कामकाज केले व विद्यमान चेअरमन सत्यशिलदादा शेरकर हे यांच्या कार्याचा वसा घेवून पुढे कामकाज करत आहेत.
स्व.निवृत्तीशेठ शेरकर यांच्या जयंती निमित्त स्व. निवृत्तीशेठ शेरकर प्रतिष्ठाण मार्फत जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये लहान गट ५ वी ते ७ वी मध्ये ३१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून प्रथम क्रमांक कु.श्रीकला नवनाथ खेबडे, रा.प. सबनीस विद्यामंदिर ना.गाव, द्वितीय क्रमांक कु.कशिष दिपक वाधवाणी,श्री अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मिडीयम ना.गाव, तृतीय क्रमांक कु.अर्णव सुर्यकांत पोखरकर, रा.प. सबनीस विद्यामंदिर ना.गाव, उत्तेजनार्थ बक्षिस कु.ईश्वरी सुहास वर्पे, शंकरराव बुट्टे इंग्लिश मिडीयम. जुन्नर यांना मिळाला.
तसेच मोठा गट इयत्ता ८ वी ते १० वी मध्ये एकुण ४९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून प्रथम क्रमांक कु.आर्या संतोष पोटे, जे.आर.इंग्लिश मिडीयम आळेफाटा, द्वितीय क्रमांक कु.सई नितीन ससाणे, शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय जुन्नर, तृतीय क्रमांक कु.निवेदिता नितीन मुळुख श्री बेल्हेश्वर विद्यामंदिर बेल्हे, उत्तेजणार्थ बक्षिस कु.स्वरा संतोष पटाडे ब्लू मिंगडेल इंटरनॅशनल स्कुल ना.गाव यांना मिळाला.
तसेच महाविद्यालयीन गट इयत्ता ११ वी ते १५ वी या मध्ये एकुण ३२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून प्रथम क्रमांक कु.श्रध्दा सुरेश अहिनवे अण्णासाहेब वाघिरे कॉलेज ओतूर, द्वितीय क्रमांक कु.यशस्वी ज्ञानेश्वर पवार रा.प. सबनीस महाविद्यालय ना.गाव, तृतीय क्रमांक कु.समृध्दी संतोष मुंगसे कला वाणिज्य महाविद्यालय चाकण, उत्तेजनार्थ बक्षिस कु.साईराज मोहन घाटपांडे नवलमल फिरोदिया विधी महा. पुणे यांना मिळाले. वरील सर्व विद्यार्थ्यांना पी.एस. हांडे व व्ही.एम डुंबरे यांनी मार्गदर्शन केले. सदर वकृत्व स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांचा कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर व संचालक मंडळाच्या शुभहस्ते गुणगौरव व सत्कार करण्यात आला. तर उपस्थितांचे आभार विघ्नहरचे व्हाईस चेअरमन अशोक घोलप यांनी मानले.





