Bihar Politics: भाजपचा ‘हा’ नेता होणार बिहारचा मुख्यमंत्री; नितीश कुमार राज्यसभेवर जाणार?
Bihar Politics: नितीश यांची प्रकृती ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्याची चिन्हे दाखवत असल्याने ते राज्यसभेवर जाऊन एखाद्या महत्त्वाच्या केंद्रीय मंत्रालयाची धुरा सांभाळण्यास प्राधान्य देऊ शकतात, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

Bihar Politics: बिहारचे मुख्यमंत्री आणि JD(U) चे अध्यक्ष नितीश कुमार राज्यसभेवर जाण्याची शक्यता असून BJP पक्ष राज्यात पहिल्यांदाच स्वतःचा मुख्यमंत्री बसवण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. राज्यसभेच्या नामांकनासाठी ५ मार्च ही अंतिम मुदत असल्याने JD(U) च्या नेत्यांच्या बंद दाराआड महत्त्वाच्या बैठका सुरू आहेत.
२० वर्षांचा कार्यकाळ, १० वेळा शपथ –
७५ वर्षीय नितीश कुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून तब्बल १० वेळा शपथ घेतली आहे. NDA ने २४३ पैकी २०२ जागा जिंकत विधानसभेत दणदणीत बहुमत मिळवल्यानंतरही ते मुख्यमंत्री झाले. २०१५ पासून ते सातत्याने या पदावर आहेत. त्यापूर्वी जितन राम मांझी यांच्या अल्पकाळाच्या मुख्यमंत्रिपदाचा अपवाद वगळता नितीश हेच बिहारचे सर्वेसर्वा राहिले आहेत.
#WATCH | Patna, Bihar | Janata Dal (United) MLC Sanjay Gandhi says, “…We will support whatever decision Nitish Kumar will take…We will support Bihar CM Nitish Kumar even if he goes to the Rajya Sabha…” pic.twitter.com/EplkgSi01C
— ANI (@ANI) March 4, 2026
BJP साठी ऐतिहासिक संधी –
हिंदी भाषिक राज्यांमध्ये बिहार हे एकमेव राज्य आहे जिथे BJP ने कधीच स्वतःचा मुख्यमंत्री दिलेला नाही. त्यामुळे नितीश यांनी मुख्यमंत्रिपद सोडल्यास हा पक्षासाठी ऐतिहासिक क्षण ठरेल.
नितीश यांना समजावण्याचे प्रयत्न –
JD(U) चे कार्याध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य संजय झा यांनी नितीश यांच्याशी जवळपास तीन तास चर्चा केली असून ते त्यांना राज्यसभेवर जाण्यास राजी करत असल्याचे सांगण्यात येते. JD(U) चे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह ऊर्फ ललन सिंह हेही दिल्लीहून पाटण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. नितीश यांच्या राज्यसभा नामांकनाची कागदपत्रे तयार असून केवळ त्यांची स्वाक्षरी बाकी असल्याचेही सांगितले जाते.
#WATCH | Patna, Bihar | On speculations around Bihar CM Nitish Kumar to resign as Bihar CM and file nomination for Rajya Sabha, Union Minister Giriraj Singh says, “…Such jokes are common on Holi. Nitish Kumar ji is our Chief Minister.” pic.twitter.com/SeQP2bmU7M
— ANI (@ANI) March 4, 2026
सम्राट चौधरी प्रमुख दावेदार –
नितीश यांनी मुख्यमंत्रिपद सोडल्यास उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हे त्या पदावर विराजमान होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, नितीश यांचे पुत्र निशांत कुमार यांना उपमुख्यमंत्रिपद दिले जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. पुढील मुख्यमंत्री नितीश यांच्या पसंतीचाच असेल, असे मानले जाते. कारण २०२७ मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार असताना कुर्मी समाजात मोठा जनाधार असलेल्या नितीश यांना दूर ढकलल्याची प्रतिमा BJP ला परवडणारी नाही.
राज्यसभा ते केंद्रीय मंत्रिपद?
नितीश यांची प्रकृती ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्याची चिन्हे दाखवत असल्याने ते राज्यसभेवर जाऊन एखाद्या महत्त्वाच्या केंद्रीय मंत्रालयाची धुरा सांभाळण्यास प्राधान्य देऊ शकतात, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.





