Nitin Nabin : राहुल गांधींना संसदेत चोख प्रत्युत्तर देऊ; नितीन नबिन यांनी व्यक्त केले मत
माझा (Nitin Nabin) ठाम विश्वास आहे की या देशात अराजकतेला कोणतीही जागा नाही. लोकशाही आणि आपल्या लोकशाही व्यवस्थांचा आदर राखलाच पाहिजे.

Nitin Nabin : माझा (Nitin Nabin) ठाम विश्वास आहे की या देशात अराजकतेला कोणतीही जागा नाही. लोकशाही आणि आपल्या लोकशाही व्यवस्थांचा आदर राखलाच पाहिजे. ज्या पद्धतीने विरोधी पक्षनेते घटनात्मक संस्थांचा अपमान करत आहेत, ती चिंतेची बाब आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही अराजकतेला थारा देऊ शकत नाही.
जर विरोधी पक्षनेत्याने अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करू आणि संसदेतही त्यांना चोख प्रत्युत्तर देऊ, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबिन यांनी ठामपणे केले. झारखंडच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर रांची येथे पोहोचलेले नितीन नबिन (Nitin Nabin) पक्षाच्या राज्य मुख्यालयात पत्रकारांशी बोलत होते.
आपल्या या दौऱ्यादरम्यान, नबिन (Nitin Nabin) भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित करतील. या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थिती तसेच पक्षाच्या योजना आणि प्राधान्यक्रमांवर चर्चा केली जाईल.
याशिवाय, ते राज्यातील नेत्यांसोबत संघटनात्मक विषयांवरही चर्चा करतील. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर नबिन यांची या राज्यातील ही दुसरी भेट आहे. यापूर्वी त्यांनी जून महिन्यात राज्याचा दौरा केला होता.






