Nitin Gadkari : “अच्छा त्यांच्यासोबतची युती होय…”; नितीन गडकरींचे ‘त्या’ युतीवरच्या विधानावर प्रेक्षकांमध्ये हास्याचा खळखळाट

Nitin Gadkari: राज्यात शिवसेनेत बंड झाल्यानंतर पुन्हा एकदा सत्तेत शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपाची सत्ता आली. शिवसेना आणि भाजपा हे मित्रपक्ष असून गेल्या अनेक वर्षांपासून यांच्यात राजकीय हिसंबंध आहेत. मधल्या काळात दोन वेळा युती तुटली. परंतु, त्यानंतरही शिवसेनेत फूट पडून पुन्हा युतीचा झाली. याबाबत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
एका मराठी वृत्तपत्राने आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी नितीन गडकरींची मुलाखत घेती त्यावेळी ते बोलत होते. मनोहर जोशी मुख्यमंत्री असल्यापासून भाजपा-शिवसेना युती आहे. मग आताच्या युतीबद्दल तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न प्रशांत दामले यांनी नितीन गडकरी यांना विचारला. त्यावर नितीन गडकरी यांनी, “शिवसेना -भाजपा युती आता नाहीय”, असे नितीन गडकरी म्हणाले.
तेवढ्यात प्रशांत दामले यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपाच्या युतीबाबत आठवण करून दिल्यावर, “अच्छा त्यांच्यासोबतची युती होय…”, असे उत्तर देताच प्रेक्षकांमध्ये एकच हास्यकल्लोळ झाला.
गेल्या अनेक वर्षांपासून नितीन गडकरी केंद्रीय राजकारणात सक्रिय आहेत. तसंच, राज्याच्या राजकारणातही ते सहभागी असतात. त्यामुळे त्यांचा राजकीय वारसदार कोण असा प्रश्न त्यांना सातत्याने विचारला जातो. त्यावर ते म्हणाले की, भाजपासाठी काम करणारा लहानातील लहान कार्यकर्ता हा माझा राजकीय वारसदार असेल,” असेम्हणत त्यांनी कोणाचेही नाव न घेता तटस्थ भूमिका घेतली.





