Nitin Gadkari : नितीन गडकारींचा नेते व कार्यकर्त्यांना खोचक टोला, म्हणाले, “लोकांना मूर्ख बनविणे…’

Nitin Gadkari – राजकारणी जसे बोलतो तसे करत नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षात राजकीय नेत्यांबद्दलची विश्वसनीयता कमी होत चालली आहे. लोकांना मूर्ख बनविणे सोपे आहे असे वाटते. काही तर समाजाला अनेक प्रकारे तोडण्यासाठी प्रयत्न करत आहे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडले.
ते, येथे अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांची चांगलीच शाळा घेतली. गडकरी नेहमीच रोखठोक बोलत असतात.
राजकारण्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत ते संगळ्यांचीच पोलखोल करतात. विशेष म्हणजे त्यांच्या बोलण्याने कोणालाही वाईट वाटत नाही, उलट आणखी व्यवस्थित काम करण्यास सुरुवात करतात.
गडकरी पुढे म्हणाले, पैसे हे साधन नाही. माझे निवडणुकीमध्ये कोणीतरी गाणे तयार केले. ते गाणे यूट्यूबवर टाकले. ते गाणे 90 लाख लोकांनी ऐकले. त्या गाण्याच्या रॉयल्टी म्हणून 85 हजार रुपये मला आणून दिले.
चांगले काम करा, आशीर्वाद पाठीशी आहे. काम केल्यानंतर कोणालाच कळले नाही पाहिजे. पण आजकाल 10 रुपये देऊन चौकात 10 फोटो लावणारे आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.
जो म्हणणार जात त्याला बसणार लात
मी जातपात पाळत नाही. मला वोट द्या किंवा नका देऊ. जो म्हणणार जात त्याला बसणार लात, असेही ते बोललो. चक्रधर स्वामी यांनी हाच संदेश दिला. समाजात अज्ञान अंधश्रद्धा, असमानता, स्त्री पुरुष विषमता हा भेद संपला पाहिजे. हाच संदेश घेऊन आपण जनतेच प्रबोधन केले पाहिजे, असे ते म्हणाले.





