‘तू किती मोठा मर्द आहेस, हे तुझ्या घरातल्यांना…’

मुंबई – “बाळासाहेबांची औषध वेळेवर दिली नाहीस. खायला दिलं नाहीस. तू मर्दांनगीवर कलंक आहेस. तू किती मोठा मर्द आहेस, हे तुझ्या घरातल्यांना विचार, ते तुला सांगतील” अशी जहरी टीका भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले,“2014 ते 2019 मध्ये तुझे लाड फडणवीसांनी पुरवले, तुला संभाळलं” अशी टीका राणे यांनी केली. “तुझ्या रक्ताचा भाऊ काय बोलतो, त्याची काय अवस्था केली? कधी आमचं तोंड उघडायला लावलस, तर महाराष्ट्राची जनता तुला चपलेने मारेल’ असं म्हणत राणे यांनी खोचक टीका केली आहे.
दरम्यान,माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सध्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु असल्याचे दिसत आहे. कारण उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या सभेत फडणवीस यांच्या भाषणाची एक क्लिप ऐकवली आणि त्यांचा उल्लेख ‘नागपूरचा कलंक’ असा केला. या टीकेचा पलटवार करत देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप ट्वीट केली आणि आठ मुद्द्यांमध्ये त्यांना उत्तर दिलं आहे. परंतु, आता भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेवर सडेतोड उत्तर दिले आहे.





