मुंबई – मुंबईच्या आग्रीपाडा परिसरात उर्दू भवन उभारले जाणार असून या कामाला भाजप आमदार नितेश राणे यांनी विरोध दर्शवला आहे. (Nitesh Rane opposes construction of Urdu Bhavan in Mumbai’s Agripada) या बांधकामाच्या विरोधात आग्रीपाडा संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याला नितेश राणे यांनी पाठिंबा दिला आहे.
नितेश राणे यांनी दावा केला की, यापूर्वी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) बांधण्यासाठी येथील जमीन आरक्षित होती; परंतु महाविकास आघाडी सरकारने हा भूखंड उर्दू भवनासाठी दिला आहे.
राणे म्हणाले, या भागातील बहुसंख्य लोकसंख्या हिंदूंची आहे, त्यामुळे येथे उर्दू भवन बनवू नये. हिंदू विचारसरणीचे सरकार आहे आणि आम्ही अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी आंदोलकांना दिली आहे.
महापुरुषांच्या सन्मानासाठी कायदा करा, मोडणाऱ्यास राज्याबाहेर हाकलून लावा – संभाजीराजे
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना उर्दू शिक्षण केंद्र बनवायचे असेल तर त्यांनी ते त्यांच्या नवीन मातोश्री निवासस्थानी बनवावे, अशी उपरोधिक सूचनाही त्यांनी केली आहे.